श्री बांदेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथिल प्रसिद्ध व जागृत अशा स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा मोठ्या थाटात, उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला . हजारो भाविकांनी श्री बांदेश्वर दर्शनाचा लाभ घेतला. या सोहळ्यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .या सोहऴ्यासाठी मंदिरावर नेत्रदिपक रोषणाई तसेच फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला सोमवारी रात्री पालखी सोहळ्याने हा उत्सव आरंभ झाला. सोमवारी श्री बांदेश्वर मंदिराभोवती श्रींची सवाद्य पालखी प्रदक्षिणा सोहळा झाला. आहे.मंगऴवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सुर्योदयापासुन ते दुसऱ्या दिवशी सुर्योदयापर्यंत स्वयंभू लिंगावर ब्राम्हणवृंदाच्या मंत्रोच्चारात अष्टौप्रहर रुद्रावर्तनद्वारा अभिषेक करण्यात आला. आवर्तने सुरु असताना अभिषेकासाठी लोकांना बाहेरुन पाण्याची कळशी ओतण्याची सुविधा आहे. या जलाभिषेकासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत श्री शिवलिलामृत ग्रंथ पारायण झाले. अनेक भाविकांनी वाचनात सहभाग घेतला. सायं ३.३०ते ८.३० या वेळेत स्थानिक भजनकर्मी तसेच श्री विठ्ठल सोहिरा महिला भजनसेवा मंडळाचे भजन झाले.
रात्रि श्रींचा मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणेचा सोहऴा झाला.यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
बुधवारी श्रींची पालखी मिरवणुकीने वाजत गाजत श्री पाटेश्वर भेट , श्री पाटेश्वर मंदिरातील भजनानंतर पालखीचे पारंपारिक राजमार्गाने मंदिरापाशी आगमन व त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा करून व भजन, महाआरती, रात्रौ दशावतार नाट्य मंडळ ,झाराप यांचा “मुंडासुर मर्दिनी” दशावतार नाट्यप्रयोग तसेच गुरुवारी समाराधना आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.