मालवणी उत्पादने विक्रीसाठी तयार
मसुरे | प्रतिनिधी : पळसंब शेती संघ आणि भगिरथ प्रतीष्ठान यांच्या माध्यमातून पळसंब मधील महिला बचत गटाची मालवणी मातीची अस्सल उत्पादने श्री.जयंती ऍग्रो पळसंब या ब्रँड खाली उपलब्ध होणार आहेत.
भागीरथ प्रतिष्ठान झाराप चे श्री.प्रसाद देवधर यांच्या प्रमुख उपस्थित श्री जयंती देवी मंदिर येथे याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर,पळसंब शेती संघाचे दिपक नाखरे, देवस्थान मानकरी श्रीप्रकाश कापडी, राजन पुजारे, उपसरपंच सुहास सावंत, सदस्य एकनाथ चिचंवलकर, मधुकर कदम, रोशन चिचंवलकर, प्रमोद सावंत, उल्हास सावंत, अविराज परब, बाळा सावंत, प्रगत शेतकरी महेश वरक, हितेश सावंत, अमित पुजारे, दादा गावकर असे गावातील रहिवाशी उपस्थित होते. तसेच उत्पादने बनवणाऱ्या महिला सौ.राजश्री पुजारे,सौ. रोशनी पुजारे, सौ. हर्षदा गोलतकर, सौ.दक्षता सावंत,सौ.मनाली सावंत,सौ. मिलन जुवेकर,सौ. सरोजिनी सावंत उपस्थित होत्या. भगिरथ प्रतिष्ठान झाराप यांच्या माध्यमातून एक वजन काटा आणि एक सिलिग मशिन बचतगटांना विनामुल्य पुरवण्यात आली.
तसेच कुळीद पिठ, मोदक पिठ, घावन पिठ,कोकम, नाचणी पिठ,हळद पावडर, नाचणी लाडू, शेंगदाणा लाडू अशी उत्पादने मुबई ,सिधुदूर्ग मध्ये विक्रिसाठी लवकरच उपलब्ध होणार आहेत असे सरपंच श्री चद्रकांत गोलतकर यानी यावेळी सांगीतले. तसेच भगीरथ प्रतिष्ठानच्या सहकार्या बद्दल आभार मानले.