चिंदर | विवेक परब : ‘बोडस चॅरिटेबल ट्रस्ट रत्नागिरी’, यांच्या कडून देण्यात येणारे २०२१च्या वर्षाचे विविध पुरस्कार जाहिर झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 2 तर रत्नागिरी जिल्ह्याला ४ पुरस्कार मिळाले आहेत. एकून ३विभागात १ संस्था आणि ५ व्यक्ती यांचा समावेश आहे. यापैकी शिपींशी येथील श्रीमती शालिनी आठल्ये या वयाने सर्वात जेष्ठ तर कणकवली येथील कवयित्री अनिता साळगांवकर ही वयाने सर्वात तरुण आहे. त्रैवार्षिक स्वरुपाचा संस्थात्मक पुरस्कार या चिपळून येथील “सह्याद्री निसर्ग मित्र” या संस्थेला मिळाला आहे. रुपये ५,००० आणि गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार मिळणारी हि तिसरी संस्था आहे.
वार्षिक स्वरूपाचा कर्तव्यनिष्ठा पुरस्कार प्राप्त २ जणां मध्ये संगमेश्वर येथिल जिवशास्र विषयाच्या निवृत्त शिक्षिका सौ. उमा शिरीष दामले यांचा समावेश आहे. ३५ वर्षाच्या सेवेत विद्यार्थी आणि गर्भवती महिलांसाठी आरोग्यपूर्ण आहार देण्याच्या कार्यात हा पुरस्कार आहे. महावितरणमध्ये सेवा बजावताना डोंगर, द-या, झाडी, काळोख, वारा, पाऊस, आणि वादळे यांची पर्वा नकरता अगदी निवृत्ती पर्यंत पुढे राहणारे कुरधुंडा येथील निवासी श्री हरिश्चंद्र भिकाजी निंगावले हे कर्तव्यनिष्ठा पुरस्काराचे दुसरे मानकरी आहेत. या दोघांना सन्मानपत्र आणि एक पुस्तक दिले जाणार आहे.
वार्षिक स्वरुपाच्या कार्यगौरव पुरस्कारामध्ये एकूण ३मानकरी आहेत. निस्वार्थी वृत्तीने सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या शिंपोशी येथील ८९ वर्षाच्या श्रीमती शालिनी धोंडदेव आठल्ये ह्या वयाने जेष्ठ आहेत तर नियतीने दिव्यांग बनवले तरी न खचताच समुपदेशन करताना इतरांना जगण्याची स्पूर्ती देणारी कणकवली येथील कवयित्री अनिता मुरलीधर साळगांवकर ही वयाने सर्वात तरुण आहे. निसर्गाचे वाचन करुन दुर्मिळ रानफुले, किटक, वृक्ष, फुले यांच्या माहितीचा समाज माध्यमातून जगभर प्रसार करणारे व एक जीवंत संदर्भ बनलेले पडेल देवगड येथील निवृत्त शिक्षक वसंत विनायक काळे हे तिसरे पुरस्कार विजेते आहेत. रुपये ३,००० आणि सन्मानपत्र अस या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना पुरस्काराची रक्कम बँकेतून दिली जाणार आहे तर सन्मान पत्र पोस्टाने पाठवली जाणार आहेत..असे बोडस चँरिटेबल ट्रस्टचे सचिव संतोष देसाई यांनी कळवीले आहे. याकामासाठी बोडस ट्रस्ट कडुन योग्य व्यक्तीचीच पारख करुनच पुरस्कार दिला जातो. अध्यक्ष प्रा. उदय बोडस हे या कामी मेहनत घेत असतात.