सरकारने सुटकेसाठी प्रयत्न करावेत.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : रशिया व युक्रेन या देशात चालू असलेल्या युद्धात युक्रेन देशातील खारकीव येथे मसुरे मठवाडी येथील कु. रूषौती उमेश भोगले ही वैधकीय शिक्षण घेणारी युवती संकटात सापडला आहे.सध्या तिच्या सह इतरांनी बंकरचा आधार घेतल्याची माहिती तिचे वडील उमेश भोगले यांनी दिली आहे. उमेश भोगले हे कळंबोली मुंबई इथे राहत असून गेल्या डिसेंबर महिन्यात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेन येथील खारकीव शहरात त्यांची मुलगी रूषौती गेलीआहे.
खारकीव शहर हे हंगेरी/पोलंड/सोलवाक.रिप./रोमानियाच्या सीमेपासून खूप लांब आहे. सध्याची युद्धस्थिती पाहता या सीमेपर्यत पोहचणे कठीण आहे. खारकीव शहर हे रशियाच्या सीमेजवळ असून रशियाने कीव व खारकीव शहरावर जोरदार हल्ला केला आहे. या दोन्ही शहरांमध्ये मिळून हजारो विद्यार्थी अडकले आहेत. अनेक विद्यार्थांची तब्येत सुद्धा बिघडत चालली असून त्यांना अन्न – पाण्याची कमतरता भासत आहेत. खारकीव येथील मुलांना दुतावासाकडून कोणतीही मदत पोहचत नसून सर्व मुले मानसिक दडपणाखाली असल्याची माहिती भोगले यांनी दिली आहे. मुलांसाठी अन्न व प्यायच्या पाण्याची सोय व्हावी याकडे प्रशासनाने लक्ष घ्यावे आणि खारकीव पासून १०० किमी अंतरावर असलेल्या बेल्गोरोड आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी रशियन प्रदेशाची सीमा ओलांडण्यासाठी रशिया देशाच्या परवानगीने शक्य असल्यास सहज मुलांना तिथे नेले जाऊ शकते. आणि भारतात परत आणले जाऊ शकते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे प्रमुख पुतीन यांचे संबंध चांगले असून पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेबानी याबाबत पुढाकार घेऊन आमच्या मुलांना भारतात परत आणण्याची विनंती उमेश भोगले केली आहे.