27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

वेंगुर्ले तालुका भाजपाच्यावतीने जागतिक मराठी राज्यभाषा दिन साजरा.

- Advertisement -
- Advertisement -

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साहित्यिक सौ.वृंदा कांबळी यांचा सत्कार.

चिंदर | विवेक परब : जागतिक मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने गुरूवर्य अ.वि.बावडेकर विदयालय शिरोडा येथे मराठी  राज्यभाषा दिन सोहळा साजरा करण्यात आला.
जिल्हयातील प्रख्यात लेखिका व कांदबरीकार साहित्यिक सौ.वृंदाताई कांबळी यांच्या हस्ते गुरूवर्य वि.स.खांडेकर यांच्या पुतळयाला हार अर्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर समारंभ स्थळी प्रमुख पाहुण्याचे आगमन झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन या शाळेचे श्री एस्.एल्.कदम सर यांनी केले. मराठी गीत सादर करुन व गुरूवर्य वि.स.खांडेकर यांच्या प्रतिमेला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.पी.एस्.कौलापूर यांच्या हस्ते पुष्पहार व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी सर्वांचे स्वागत करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख करुन दिली. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक अजीत राऊळ यांनी आपले विचार मांडले. पी.के.कुबल यांनी मराठी दिनानिमित्त स्वरचित कविता सादर केली. त्यानंतर “आनंदयात्री” या ग्रुप मधील सौ.सुरेखा देशपांडे यांनी आपली “आई” हि कविता सादर केली. स्वप्निल वेंगुर्लेकर, विशाल उगवेकर यांनी आपल्या कविता सादर केल्या. शिरोडा शहर भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर होडावडेकर गुरुजी यांनी आपल्या मनोगतामध्ये प्राथमिक शाळेमध्ये मराठी मध्ये शिक्षण किती गरजेचे आहे व त्याच आपल्या घरामध्ये सुध्दा मराठी भाषेचे वापराचे सातत्य ठेवणे व दशावतारी लोककलेचे  महत्व या संदर्भात आपले विचार मांडले.

भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने जिल्हयातील प्रख्यात लेखिका व साहित्यिक  सौ.वृंदाताई कांबळी यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष कौलापूरे सर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ  देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती सौ.वृंदा कांबळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले . त्यानंतर श्री.पी.एस कौलापूरे यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले या वेळी मान्यवर म्हणून भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळूस्कर, आरवली ग्रामपंचायत सरपंच तातोबा कुडव, शिरोडा माजी सरपंच विजय पडवळ, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य सौ.समृद्धी धानजी, उपतालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे मान्यवर म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी यांनी केले .या कार्यक्रमाला भाजप शिरोडा शहर उपाध्यक्ष संतोष अणसूरकर, सरचिटणीस सुरेश म्हाकले, भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत, शिरोडा, आरवली, सागरतीर्थ, शक्ती केंद्र प्रमुख  विदयाधर धानजी,महादेव नाईक, विजय बागकर, शिरोडा भाजप ज्येष्ठ पदाधिकारी अनिल गावडे, भाजप शिरोडा पदाधिकारी वासुदेव आरोस्कर, आरवली भाजप पदाधिकारी विश्वनाथ उर्फ भाई शेलटे, एकनाथ साळगांवकर, त्याच प्रमाणे आनंदयात्री ग्रुपचे आशिष वराडकर, जे.जे.पाटील सर उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साहित्यिक सौ.वृंदा कांबळी यांचा सत्कार.

चिंदर | विवेक परब : जागतिक मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने गुरूवर्य अ.वि.बावडेकर विदयालय शिरोडा येथे मराठी  राज्यभाषा दिन सोहळा साजरा करण्यात आला.
जिल्हयातील प्रख्यात लेखिका व कांदबरीकार साहित्यिक सौ.वृंदाताई कांबळी यांच्या हस्ते गुरूवर्य वि.स.खांडेकर यांच्या पुतळयाला हार अर्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर समारंभ स्थळी प्रमुख पाहुण्याचे आगमन झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन या शाळेचे श्री एस्.एल्.कदम सर यांनी केले. मराठी गीत सादर करुन व गुरूवर्य वि.स.खांडेकर यांच्या प्रतिमेला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.पी.एस्.कौलापूर यांच्या हस्ते पुष्पहार व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी सर्वांचे स्वागत करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख करुन दिली. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक अजीत राऊळ यांनी आपले विचार मांडले. पी.के.कुबल यांनी मराठी दिनानिमित्त स्वरचित कविता सादर केली. त्यानंतर "आनंदयात्री" या ग्रुप मधील सौ.सुरेखा देशपांडे यांनी आपली "आई" हि कविता सादर केली. स्वप्निल वेंगुर्लेकर, विशाल उगवेकर यांनी आपल्या कविता सादर केल्या. शिरोडा शहर भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर होडावडेकर गुरुजी यांनी आपल्या मनोगतामध्ये प्राथमिक शाळेमध्ये मराठी मध्ये शिक्षण किती गरजेचे आहे व त्याच आपल्या घरामध्ये सुध्दा मराठी भाषेचे वापराचे सातत्य ठेवणे व दशावतारी लोककलेचे  महत्व या संदर्भात आपले विचार मांडले.

भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने जिल्हयातील प्रख्यात लेखिका व साहित्यिक  सौ.वृंदाताई कांबळी यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष कौलापूरे सर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ  देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती सौ.वृंदा कांबळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले . त्यानंतर श्री.पी.एस कौलापूरे यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले या वेळी मान्यवर म्हणून भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळूस्कर, आरवली ग्रामपंचायत सरपंच तातोबा कुडव, शिरोडा माजी सरपंच विजय पडवळ, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य सौ.समृद्धी धानजी, उपतालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे मान्यवर म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी यांनी केले .या कार्यक्रमाला भाजप शिरोडा शहर उपाध्यक्ष संतोष अणसूरकर, सरचिटणीस सुरेश म्हाकले, भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत, शिरोडा, आरवली, सागरतीर्थ, शक्ती केंद्र प्रमुख  विदयाधर धानजी,महादेव नाईक, विजय बागकर, शिरोडा भाजप ज्येष्ठ पदाधिकारी अनिल गावडे, भाजप शिरोडा पदाधिकारी वासुदेव आरोस्कर, आरवली भाजप पदाधिकारी विश्वनाथ उर्फ भाई शेलटे, एकनाथ साळगांवकर, त्याच प्रमाणे आनंदयात्री ग्रुपचे आशिष वराडकर, जे.जे.पाटील सर उपस्थित होते.

error: Content is protected !!