बांदा | राकेश परब : महाराष्ट्र नवनिर्माण सेना माध्यमातून ‘शिव आरोग्य सप्ताह’ निमित्त विलवडे या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर घेऊन रुग्णांची तपासणी करण्यात आली.
विलवडे परिसरातील नागरिकांनी आरोग्य शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. माजी आमदार तथा मनसेचे नेते परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या तेजस्विनी हेल्थकेअरचे डाॅक्टर व त्यांची टीम,मनसेच्या कार्यकर्त्याचे विलवडे गावांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद विलवडे शाळा नं. १ येथे आयोजित करण्यात आलेल्या संपूर्ण शारीरिक तपासणी अॅक्युप्रेशर व फिजिओ थेरपी तपासणी करण्यात आली.
उद्घाटन मनसेचे जिल्हा परिवहन कार्याध्यक्ष संतोष भैरवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विलवडे सरपंच दिनेश दळवी,मनसेचे सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत, माजी उपसभापती विनायक दळवी,कृष्णा सावंत,माजी सरपंच बाळकृष्ण दळवी,विलवडे वाचनालयाचे अध्यक्ष राजाराम दळवी,विलवडे पतसंस्थेचे व्यवस्थापक सोनू दळवी,परेश धरणे,संतोष दळवी,प्रमोद दळवी, गोविंद तांबे,डॉ.किरण साळगावकर,स्नेहा जाधव,अक्षय नेरूरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार माजी उपसरपंच प्रकाश दळवी यांनी मानले.