26.4 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

पोलीस भरतीसाठी लेखी प्रमाणेच मैदानी स्पर्धेची तयारी महत्वाची : आंतरराष्ट्रीय एथलीट प्रशांत सारंग.

- Advertisement -
- Advertisement -

मुणगे हायस्कुल येथे पोलीस भरती, आर्मी भरती, एथलेटिक्स कार्यशाळेचे आयोजन.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : शालेय जीवनात क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हा. या गुणांचा उपयोग पुढील आयुष्यात होईल. पोलीस आणि आर्मी भरतीसाठी फोकस हा मैदानी स्पर्धेची तयारी पूर्ण करण्यावर ध्या. तुमच्या मनातून असलेल्या गोष्टी कृतीत उतरा. या गावातून अनेक विद्यार्थी पोलिस भरतीमध्ये पुढे यावेत म्हणजे ही कार्यशाळा आयोजित करण्याचा हेतू साध्य होईल असे प्रतिपादन तांबळडेग गावचे सुपुत्र व आंमतरराष्ट्रीय एथलेट प्रशांत सारंग यांनी येथे केले.

पवन स्पोर्ट्स फाउंडेशन व श्री भगवती हायस्कुल व स्व.वीणा सुरेश बांदेकर ज्यु. कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस यांच्या वतीने पोलीस भरती, आर्मी भरती, एथलेटिक्स कार्यशाळेचे आयोजन मुणगे हायस्कुल सभागृहात करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक प्रसाद बागवे यांनी कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, आंतरराष्ट्रीय एथलेट व मरेथॉनपटू प्रशांत सारंग, माजी सभापती डॉ मनोज सारंग, सरपंच सौ साक्षी गुरव, उपसरपंच धर्माजी आडकर, संस्था व्यवस्थापक आबा पुजारे, पोलीस पाटील सौ साक्षी गोविंद सावंत, श्रीमती मेस्त्री, माजी सरपंच वसंत शेट्ये, विजय पडवळ, ट्रेनर श्री अनिकेत पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत व्यवस्थापक देवदत्त पुजारे यांनी केले.
सुरेश बांदेकर म्हणाले, पवन स्पोर्ट्स फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद आहे. संस्था नेहमीच या फाउंडेशनच्या उपक्रमांना सहकार्य करेल. करियर चांगलं घडण्यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवा.
डॉ मनोज सारंग म्हणाले, जिद्द, चिकाटी व प्रयत्नात सातत्य ठेवा. ध्येया पर्यंत पोचताना प्रामाणिक प्रयत्न करा. तसेच मैदानी व लेखी अशी दोन्ही पद्धतीने तयारी ठेवा. फिटनेस चांगला रहावा यासाठी आहाराला सुद्धा महत्व ध्या. देवदत्त उर्फ आबा पुजारे म्हणाले, ध्येय तुमची उतुंग ठेवा. वर्दीची शान वेगळी असते. त्यामुळे फाउंडेशनच्या माध्यमातून तुमच्या महत्वकांक्षा पूर्ण करा. तुमच्या प्रयत्नांना अभ्यासाची साथ ध्या. यावेळी उपस्थित विध्यार्थी व प्रशिक्षणार्थी याना मैदानी चाचणी कशा पद्धतीने घेतली जाते याची माहिती देण्यात आली. यावेळी शिक्षक, ग्रामस्थ, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. आभार सहा शिक्षक एन. जी. वीरकर यांनी मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!