बांदा / राकेश परब : महाराष्ट्रात आराध्य दैवंत , शौर्य व धैर्याची मूर्ती असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे लाखो करोड जनतेचे पोशिंदे , ज्यांच्या आईने म्हणजेच राजमाता जिजाऊ यांनी त्यांच्यावर केलेले संस्कार आणि त्यांच्या विचारांच्या जोरावर शिवरायांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली, अशा शिवबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक मुलाने यश प्राप्त केले पाहिजे आणि म्हणूनच दिन दुबळ्या , निराधार बालकांच्या संगोपनाच्या कामाची सुरुवात अशाप्रकारे मुलांची जबाबदारी घेऊन करावे या विचारांनी कोकण संस्थेच्या माध्यमातून आज आंबेगाव – कात्रज पुणे येथे श्रीलोचन बालविकास केंद्राची सुरुवात करण्यात आली. कोरोनाने भारतातील लाखो मुलांना अनाथ केले, करोडो लोकांना उपसमारीला सामोरे जावे लागले आणि लाखो नोकऱ्या गेल्या तसेच कित्येक लोकांना मानसिक ताप सहन करावा लागला . केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या परीने सर्वाना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला , अनाथ मुलांना आर्थिक मदत करायची घोषणा पण झालीय पण अजून ही बरीच अशी मुले आहेत ज्यांच्या घरचा कमावता व्यक्ती गेला , आणि कित्येकांनी आई वडील पण गमावले . कित्येक कुटुंबे रोगात गेल्यामुळे उध्वस्त झालीत आणि काही पालक तणावामुळे व्यसनाधीनतेकडे वळले पण मग अशा पालकांच्या मुलांचा यात काय दोष कोणाचा म्हणावा लागेल . अशा जास्तीत जास्त मुलांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेल्या ऑक्टोबर मध्ये टिटवाळा येथे श्रीलोचन आश्रमाची सुरुवात करण्यात आली आहे आणि तेथे २२ मुलांचे संगोपन केले जात आहे. पुण्यातील गल्ली स्कुल आणि युवा किरण असे उपक्रम चालवत असताना पुण्यातील अशा मुलांच्या भवितव्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचनावजा विनंती सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात होती , त्या दृष्टिकोनातून संस्थेने पुणे आंबेगाव येथे आज ५० निराधार मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आश्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना मदत केली असून , ज्यांची काळजी घ्यायला कोणी नाही अशा पुण्यातील मुलांसाठी श्रीलोचन आश्रम हा संस्थेचा दुसरा आश्रम सुरु करण्यात आला आहे.या आश्रमातील प्रत्येक मुलाच्या आरोग्य , शिक्षणाबरोबर त्यांचा सर्वांगिण विकास करण्यात संस्था संपूर्ण पुढाकार घेणार आहे.१९ फेब्रुवारी रोजी या आश्रमाचे उद्घाटन सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बालशिवरायांच्या रुपात विहान महांगरे यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले . श्रीलोचन बालविकास केंद्र पुणेची आज सुरुवात करत आहोत असे श्री. दयानंद कुबल यांनी बोलताना सांगितले . यावेळी संस्थाध्यक्ष दयानंद कुबल, योगेश भोसले , संभाजी भोसले, सतीश श्रीखंडे , राजू गावडे , प्रेम कुबल, राहुल शिंदे , सुरज कदम , आनंद कुबल, प्रीती पांगे , साक्षी पोटे , संजय कुलकर्णी , प्रसाद देवरूखकर , नितीन ढम , आकाश देवकर , कुंदन कुबल, धनाजी पाटील , शोभा तावरे आणि २६ मुले उपस्थित होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल महांगरे तर आभार सुप्रिया गाढवे यांनी मांडले
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -