कलादालनाच्या दुरावस्थेबद्दल रावराणे समाजात होती नाराजी.
वैभववाडी | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीत असलेल्या महाराणा प्रताप सिंह कलादालनाच्या सुशोभीकरणासाठी 60 लाख रुपये खर्च करून कामे सुरु झाल्याची माहिती वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्यकार्यकारी अधिकारी सूरज कांबळे यांनी बोलताना दिली आहे.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह कलादालना साठी पहिल्या टप्यात इमारत आणि इतर कामासाठी निधी खर्च झाला होता.दुसऱ्या टप्प्यात त्याच्या सुशोभीकरणाचे काम बाकी होते.त्यामुळे राज्याच्या पर्यटन खात्यातंर्गत उपलब्ध होणाऱ्या निधी साठी नगरपंचायतीने प्रस्ताव पाठविला होता.तो मंजूर होऊन त्यासाठी 60 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे.त्यातून कामे सुरु झाल्याची माहिती कांबळे यांनी बोलताना दिली.
कलादालनाच्या भोवतलाची पक्की कंपाऊंड भिंत,
गार्डनचे सुशोभीकरण,इमारती वर शोभिवंत कौले,पेव्हर ब्लॉक इत्यादी कामे सुरु झाली आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
या ठिकाणी पर्यटक आकर्षित होण्यासाठी आणखी काही कामे करण्यासाठी पर्यटन विकास खात्याकडून पुढे निधीची मागणी केली जाईल तसेच नगरपंचायत या वास्तूकडे गांभीर्याने लक्ष देईल.जे जे करता येईल ते केले जाईल अशी माहिती कांबळे यांनी दिली आहे.
दरम्यान कलादालनाची झालेली दुरावस्था पाहून रावराणे समाजात नाराजी व्यक्त होत होती. मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत चर्चा होऊन त्यांनी नगरपंचायतीला तसे निवेदनही दिलेले होते .