बांदा | राकेश परब : सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थी व महिलांना त्यांच्या विषयावर मार्गदर्शन व मोफत सॅनिटरी पॅड वाटप, आरोग्य स्वच्छता जनजागृती सिंधुदिशा आरोग्यम ह्या उपक्रमाचा नेमळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शुभारंभ करण्यात आला.
सिंधुदिशा संस्थेच्या वतीने जनजागृती मोहीम टप्याटप्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालय येथे राबवण्याचा विचार आहे असे मनोगत सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश परशुराम परब यांनी व्यक्त केले.
भाई सावंत आयुवैद महाविद्यालय यांचे विशेष मार्गदर्शन पाटिल मॅडम व मसुरकर मॅडम मार्गदर्शन लाभले, नेमळे माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर ,नेमळे कमिटीचे अध्यक्ष आत्माराम राऊळ, सिंधुदिशाचे कार्याध्यक्ष विलास राऊळ उपस्थित होते. सिंधुदिशा संस्थाध्यक्ष रुपेश परशुराम परब यांनी प्रास्ताविक व आभार व्यक्त केले.