कणकवली | उमेश परब : संपूर्ण आयुष्यभर काबाडकष्ट करीत, फोंडाघाट येथील कृषी संशोधन केंद्रात, तुटपुंज्या पगारावर कार्यरत राहून, पोटाची खळगी भरताना वयाच्या साठीनंतर जडलेल्या कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने उरलीसुरली, साठवलेली पुंजीही संपली. केमोथेरपी, औषध -उपचार आणि इतर खर्चासाठी कृषी संशोधन केंद्रातील कृषी विद्यावेत्ता आणि सहकारी स्टाफनेही जमेल तेवढी, आर्थिक मदत केली. मात्र या दुर्धर आजारावरील महागडे औषधोपचार वासून उभे आहेत.
त्यामुळे जगण्याची आणि शेतीची सेवा करण्याची उमेद असणाऱ्या फोंडाघाट येथील शालिनी शंकर डफळे- वय ६५ वर्षे, ह्यांना आता जगण्यासाठी, समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांची गरज आहे. त्यांची वालावलकर हॉस्पिटल, डेरवण-रत्नागिरी येथे उपचार सुरु असून इतर बाबी मोफत असल्या तरी विविध टेस्ट आणि रेडिओलॉजी सारख्या बाबींसाठी येणारा इतर खर्च खूप मोठा आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, स्थानिक ग्रामस्थ, संस्था यांनी तिचा भाऊ वासुदेव शंकर डफळे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-फोंडाघाट येथे अकौंट नंबर – २०१७०२०१३७३ – आय. एफ. एस्. सी. नंबर – MAHB0000069 वर आपली बहुमूल्य आर्थिक मदत पाठवून शालिनीला जगण्याची उमेद द्यावी, अशी विनंती तिचा रोजंदारीवरील एकुलता एक भाऊ वासुदेव आणि तिच्या वाडीवरील शेजारी मंडळींनी केली आहे.