नगरसेविका तृप्ती मयेकर यांच्या संकल्पनेतून आणि नगरसेविका सेजल परब व नगरसेवक पंकज सादये यांच्या सहकार्यातून शिबिराचे आयोजन..
मालवण | विनीत मंडलिक : मालवण शहरातील ‘प्रभाग क्रमांक ८’ येथे आज बुधवार दि 23फेब्रुवारी आणि उद्या गुरुवार दि 24 फेब्रुवारीला वायरी गर्दे रोड येथे नगरसेविका सौ. तृप्ती मयेकर यांच्या निवासस्थानाशेजारील श्री. रुपेश साळगांवकर कंपाऊड या ठिकाणी ‘नवीन आधार कार्ड शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.

तरी प्रभागातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक व मालवण शिवसेना यांच्यामार्फत करण्यात आली आहे
या शिबिरात नवीन आधार कार्ड बनविणे, आधार कार्ड मधील नाव पत्ता आणि जन्म तारीख या मध्ये दुरुस्ती करणे , मोबाईल क्रमांक लिंक करणे इत्यादी सेवांची पूर्तता केली जाईल.
अधिक माहिती साठी युवा समाजसेवी श्री.तपस्वी मयेकर : (9404598281) आणि श्री. राजू परब : (9422552128) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.