बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बांदा गावाला “पिंपळगाव” ही उपमा दिलेले प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरुरकर यांचे कुटुंबीय व नातेवाईक यांनी येथील ऐतिहासिक नट वाचनालयाला ६० हजार रुपयांची देणगी दिली आहे. या रकमेतून साहित्यिक, शैक्षणिक व वाचन चळवळीशी निगडित कार्यक्रम करण्याचे आवाहन प्रकाश नेरुरकर यांनी केले आहे.
यावेळी श्री नेरुरकर यांनी वाचनालायला भेट देत देणगीची रक्कम सुपूर्द केली. नेरुरकर यांच्या भगिनी शरयू साळगावकर यांनी २५ हजार रुपये, जावई उल्हास म्हापणकर यांनी १० हजार रुपये, भाची जोत्स्ना इंगळे यांनी ५ हजार रुपये, शाम वालावलकर यांनी ५ हजार रुपये, भगिनी पुष्पा वालावलकर यांनी ५ हजार रुपये, भाचा दिनार वालावलकर यांनी ५ हजार रुपये, भाची तेजश्री बांबूळकर यांनी ५ हजार रुपये अशी एकूण ६० हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, कार्यवाह राकेश केसरकर, संचालक निलेश मोरजकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक-मोरजकर, अमिता परब, सुनील नातू आदी उपस्थित होते. नट वाचनालयाच्या वाचन चळवळीसाठी भविष्यात नेरुरकर कुटुंबीय व नातेवाईक निश्चितच सहकार्य करतील असा विश्वास यावेळी श्री नेरुरकर यांनी व्यक्त केला.