बांदा |राकेश परब : पंढरपूर वारी करुन आलेल्या मळगांव श्री विठ्ठल मंदिराच्या पालखीचे बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात स्वागत करण्यात आले. ३२५ वर्षांपूर्वी मळगांव येथे श्री विठ्ठलाचे भक्त
संत गोपाळबोधबुवा मळगांवकर यांनी श्री विठ्ठल मंदिराची स्थापना केली. त्यांना मिळालेल्या प्रासादिक मुर्तीची पालखी कार्तिकी वारीला पंढरपुरात नेली जाते . परत आल्यावर दोन महिने कालावधीत सिंधुदुर्ग व लगतच्या भागातील गावात पालखी नेली जाते अशी माहीती दामोदरबुवा पंढरीनाथ गोसावी यांनी यावेळी दिली. दत्तप्रसाद पावसकर, राजेश पावसकर, प्रकाश मिशाळ, गजानन विरनोडकर,रामदास वळंजू, प्रसाद वाळके,राकेश विरनोडकर ,आशुतोष भांगले, अभिनय बांदेकर,दिनेश पावसकर, मंथन विरनोडकर आदींसह अनेक सेवेकरी मंडळीच्या उपस्थितीत पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी आरती करुन प्रसाद वाटण्यात आला. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली.