25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावेत ; असलदेतील शिवजयंती उत्सवात पोलिस निरिक्षक खंडागळे यांनी केले आवाहन.

- Advertisement -
- Advertisement -

महिलांसाठी आयोजित ” खेळ पैठणीचा” स्पर्धेत स्वाती परब ठरल्या विजेत्या.

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक आदर्शवत सुशासन निर्माण केले होते.त्यामुळे शिवजयंती उत्सव साजरा होताना आम्हाला आनंद होत आहे. महाराजांनी स्वराज्य स्थापन करत इतिहास रचला आहे.या मंडळाने गावात शिवजयंती उत्सव साजरा करत इतिहासाची आठवण करुन दिली.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावेत,असे प्रतिपादन कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी केले.

असलदे गावठणवाडी येथे ग्रामविकास मंडळ व शिवसाई मित्रमंडळ यांच्या संयुक्तपणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी सरपंच पंढरी वायंगणकर, सोसायटी चेअरमन भगवान लोके,तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे,उपसरपंच संतोष परब , पोलीस पाटील सावित्री पाताडे,सुरेश सुतार, रामचंद्र लोके गुरुजी, संचालक दिनकर दळवी,परशुराम परब,उदय परब,शामराव परब,अनिल तांबे,सुरेश मेस्त्री, दीपेश तांबे, माजी सरपंच लक्ष्मण लोके, ग्रामसेवक आर.डी. सावंत, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल परब आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच या शिवजयंती उत्सवास सभापती मनोज रावराणे,पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके,नांदगाव सरपंच अफ्रोजा नावलेकर, कोळोशी सरपंच ऋतुजा सावंत, नांदगाव उपसरपंच धीरज मोर्ये आदी मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.

सोसायटी चेअरमन म्हणाले,शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते.त्यांनी स्वराज्याची स्थापना केल्यामुळेच आपण स्वाभिमानाने जीवन जगत आहोत. समाजातील सर्व घटकांनी शिवचरित्र आत्मसात करण्याची गरज आहे.शिवाजी महाराज यांनी रचलेला इतिहास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या मंडळाने सातत्याने हा शिवजयंती उत्सव सुरु ठेवला आहे,त्यांबद्दल या मंडळाचे कौतुक केले.

दिवसभर शिवजयंती उत्सवानिमित्त शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन,महिलांसाठी खेळ पैठणीचा ही स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत १५ महिलांनी सहभाग घेतला,त्यात प्रथम स्वाती सत्यवान परब,द्वितीय नम्रता मेहुल घाडी,तृतीय प्रतीक्षा प्रकाश शिंदे विजेत्या ठरल्या आहेत.या स्पर्धेचे निवेदक म्हणून बाळू वालावलकर कणकवली यांनी काम पाहिले.या विजेत्या महिलांना पैठणी देत मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत पाहिले बक्षीस पैठणी संतोष घाडी व उर्वरित दोन बक्षिसे मंडळाच्या वतीने देण्यात आली.

लहान मुलांनी शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्रावर उत्कृष्ट भाषणे केलीत.महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम झाला. दिंडी भजन ओम श्री. पावणाई कला क्रीडा सेवा मंडळ , दाभोळे , मधलीवाडी यांनी भजन सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तातोबा घाडी यांनी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

महिलांसाठी आयोजित " खेळ पैठणीचा" स्पर्धेत स्वाती परब ठरल्या विजेत्या.

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक आदर्शवत सुशासन निर्माण केले होते.त्यामुळे शिवजयंती उत्सव साजरा होताना आम्हाला आनंद होत आहे. महाराजांनी स्वराज्य स्थापन करत इतिहास रचला आहे.या मंडळाने गावात शिवजयंती उत्सव साजरा करत इतिहासाची आठवण करुन दिली.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावेत,असे प्रतिपादन कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी केले.

असलदे गावठणवाडी येथे ग्रामविकास मंडळ व शिवसाई मित्रमंडळ यांच्या संयुक्तपणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी सरपंच पंढरी वायंगणकर, सोसायटी चेअरमन भगवान लोके,तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे,उपसरपंच संतोष परब , पोलीस पाटील सावित्री पाताडे,सुरेश सुतार, रामचंद्र लोके गुरुजी, संचालक दिनकर दळवी,परशुराम परब,उदय परब,शामराव परब,अनिल तांबे,सुरेश मेस्त्री, दीपेश तांबे, माजी सरपंच लक्ष्मण लोके, ग्रामसेवक आर.डी. सावंत, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल परब आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच या शिवजयंती उत्सवास सभापती मनोज रावराणे,पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके,नांदगाव सरपंच अफ्रोजा नावलेकर, कोळोशी सरपंच ऋतुजा सावंत, नांदगाव उपसरपंच धीरज मोर्ये आदी मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.

सोसायटी चेअरमन म्हणाले,शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते.त्यांनी स्वराज्याची स्थापना केल्यामुळेच आपण स्वाभिमानाने जीवन जगत आहोत. समाजातील सर्व घटकांनी शिवचरित्र आत्मसात करण्याची गरज आहे.शिवाजी महाराज यांनी रचलेला इतिहास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या मंडळाने सातत्याने हा शिवजयंती उत्सव सुरु ठेवला आहे,त्यांबद्दल या मंडळाचे कौतुक केले.

दिवसभर शिवजयंती उत्सवानिमित्त शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन,महिलांसाठी खेळ पैठणीचा ही स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत १५ महिलांनी सहभाग घेतला,त्यात प्रथम स्वाती सत्यवान परब,द्वितीय नम्रता मेहुल घाडी,तृतीय प्रतीक्षा प्रकाश शिंदे विजेत्या ठरल्या आहेत.या स्पर्धेचे निवेदक म्हणून बाळू वालावलकर कणकवली यांनी काम पाहिले.या विजेत्या महिलांना पैठणी देत मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत पाहिले बक्षीस पैठणी संतोष घाडी व उर्वरित दोन बक्षिसे मंडळाच्या वतीने देण्यात आली.

लहान मुलांनी शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्रावर उत्कृष्ट भाषणे केलीत.महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम झाला. दिंडी भजन ओम श्री. पावणाई कला क्रीडा सेवा मंडळ , दाभोळे , मधलीवाडी यांनी भजन सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तातोबा घाडी यांनी केले.

error: Content is protected !!