28.5 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

शाळेला वाळवी…भयभीत होणारच ना कोवळी पालवी..!(विशेषवृत्त)

- Advertisement -
- Advertisement -

शिक्षण विभागाचे नियम शिक्षणाच्याच का येतायत आड..?

इमारत धोकादायक म्हणून तिचा मतदान केंद्र म्हणून वापर नाही पण विद्यार्थ्यांनी घ्यायचंय तिथेच बसून  शिक्षण..!

बांदा  | राकेश परब : “बिनभिंतीची उघडी शाळा…लाखो इथले गुरु ,झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करु..!
बघु बंगला या मुंग्यांचा…
सूर ऐकुया त्या भुंग्यांचा,
फुलाफुलांचे रंग दाखवीत..
फिरते फुलपाखरु…!”
ग.दि.माडगूळकरांच्या या पंक्ती शालेय भिंतींपल्याडची निसर्ग जीवन शिक्षण परिक्रमा घडवून आणतात.
आज बिनभिंतींच्या शाळांचे एक वेगळे महत्वही आहे.
पण समजा एखाद्या शाळेच्याच भिंतींतून ही सगळी निसर्गमोहिनी हळूहळू दिसू लागली तर काय होईल..?
हे तेंव्हाच घडेल जेंव्हा त्या भिंती पोखरल्या जातील आणि त्यावर वाळवीची,मुंग्यांची वारुळे तयार होतील. पण आता तो अनुभव जीवनाचा अभ्यास न रहाता जीवन बचावाची धाकधुक होऊन जाईल.

अशीच धाकधुक सध्या सावंतवाडी तालुक्यातील मडुरे गांवच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी,शिक्षक आणि भिंतीच्या शाळेची रचना अनुभवते आहे.
मडुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ या प्रशालेच्या भिंतीमध्ये वाळवीची वारुळे तयार झाल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. वाळवी भिंतीतून छपरापर्यंत पोहोचल्याने छप्परही मोडकळीस आले आहे. याबाबत सिंधुदुर्ग जि. प. चा शिक्षण विभाग मात्र उदासीन आहे.
शाळेकडून वारंवार पाठपुरावा करुनही कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने नसल्याने पालकांमधून भीतीयुक्त संताप व्यक्त होत आहे.
मडुरा जि. प. प्राथमिक प्रशालेची इमारत भयावह स्थितीत उभी आहे. एका वर्गखोलीसह पोषण आहाराच्या खोलीतही वाळवीची भली मोठी वारुळे तयार झाली आहेत. पाच वर्षांपूर्वीच प्रशाला इमारत निर्लेखित करण्यात आली आहे. धोकादायक इमारतीच्या अहवालामुळे या प्रशालेत मतदान प्रक्रिया राबविली जात नाही. मात्र, विद्यार्थ्यांना बसवून शाळा नियमितपणे सुरु आहे.
प्रशाला स्तरावरुन शिक्षण विभागाकडे या गंभीर प्रश्नांबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेतही या विषयावर चर्चा, ठराव होतात. मात्र, इमारत दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. शिक्षण विभागाचे नियम आड येत असल्याचीही माहिती मिळाली आहे.
प्रशालेत सध्या ४ वर्गखोल्या व पोषण आहार शिजविण्यासाठी खोली आहे. सध्या प्रशालेचा पट २९ असून दोन शिक्षक कार्यरत आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे दोन शिक्षकांसाठी दोन वर्गखोल्या मंजूर होऊ शकतात. उर्वरित दोन वर्गखोल्यांचे काय करायचे ? असा प्रश्न शाळा व्यवस्थापन समितीसमोर आहे. या सर्व प्रक्रियेत लहान विद्यार्थी मात्र भरडण्याची शक्यता आहे.
येत्या पावसाळ्यापूर्वी इमारत दुरुस्ती न झाल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. वारुळांमध्ये साप राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. इमारत धोकादायक झाल्याने प्रशासन निवडणूक प्रक्रिया घेत नाही. म्हणजे प्रशासनाला एका दिवसासाठी राहणार्‍या निवडणूक अधिकारी व मतदारांची काळजी आहे आणि ते योग्यच आहे पण कायम त्याच धोकादायक इमारतीखाली जीव मुठीत घेऊन राहणार्‍या विद्यार्थ्यांची जराही काळजी नाही, असा आरोप उपसरपंच विजय वालावलकर व ग्रामस्थ यशवंत माधव यांनी केला आहे.

आज वाळविची वारुळे आहेत..आणि निसर्गाच्या अन्नसाखळीनुसार जिथे वाळवी,मुंग्या आणि वारुळ तिथे पुढील मुक्काम सापाचाच..! “शाळेवर कमजोर छप्पर ,पोखरलेल्या भिंतीत वाळवी…तिथे नक्कीच भयभीत होणार ना… विद्यार्थीरुपी कोवळी पालवी..!”

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिक्षण विभागाचे नियम शिक्षणाच्याच का येतायत आड..?

इमारत धोकादायक म्हणून तिचा मतदान केंद्र म्हणून वापर नाही पण विद्यार्थ्यांनी घ्यायचंय तिथेच बसून  शिक्षण..!

बांदा  | राकेश परब : "बिनभिंतीची उघडी शाळा...लाखो इथले गुरु ,झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करु..!
बघु बंगला या मुंग्यांचा...
सूर ऐकुया त्या भुंग्यांचा,
फुलाफुलांचे रंग दाखवीत..
फिरते फुलपाखरु...!"
ग.दि.माडगूळकरांच्या या पंक्ती शालेय भिंतींपल्याडची निसर्ग जीवन शिक्षण परिक्रमा घडवून आणतात.
आज बिनभिंतींच्या शाळांचे एक वेगळे महत्वही आहे.
पण समजा एखाद्या शाळेच्याच भिंतींतून ही सगळी निसर्गमोहिनी हळूहळू दिसू लागली तर काय होईल..?
हे तेंव्हाच घडेल जेंव्हा त्या भिंती पोखरल्या जातील आणि त्यावर वाळवीची,मुंग्यांची वारुळे तयार होतील. पण आता तो अनुभव जीवनाचा अभ्यास न रहाता जीवन बचावाची धाकधुक होऊन जाईल.

अशीच धाकधुक सध्या सावंतवाडी तालुक्यातील मडुरे गांवच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी,शिक्षक आणि भिंतीच्या शाळेची रचना अनुभवते आहे.
मडुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ या प्रशालेच्या भिंतीमध्ये वाळवीची वारुळे तयार झाल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. वाळवी भिंतीतून छपरापर्यंत पोहोचल्याने छप्परही मोडकळीस आले आहे. याबाबत सिंधुदुर्ग जि. प. चा शिक्षण विभाग मात्र उदासीन आहे.
शाळेकडून वारंवार पाठपुरावा करुनही कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने नसल्याने पालकांमधून भीतीयुक्त संताप व्यक्त होत आहे.
मडुरा जि. प. प्राथमिक प्रशालेची इमारत भयावह स्थितीत उभी आहे. एका वर्गखोलीसह पोषण आहाराच्या खोलीतही वाळवीची भली मोठी वारुळे तयार झाली आहेत. पाच वर्षांपूर्वीच प्रशाला इमारत निर्लेखित करण्यात आली आहे. धोकादायक इमारतीच्या अहवालामुळे या प्रशालेत मतदान प्रक्रिया राबविली जात नाही. मात्र, विद्यार्थ्यांना बसवून शाळा नियमितपणे सुरु आहे.
प्रशाला स्तरावरुन शिक्षण विभागाकडे या गंभीर प्रश्नांबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेतही या विषयावर चर्चा, ठराव होतात. मात्र, इमारत दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. शिक्षण विभागाचे नियम आड येत असल्याचीही माहिती मिळाली आहे.
प्रशालेत सध्या ४ वर्गखोल्या व पोषण आहार शिजविण्यासाठी खोली आहे. सध्या प्रशालेचा पट २९ असून दोन शिक्षक कार्यरत आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे दोन शिक्षकांसाठी दोन वर्गखोल्या मंजूर होऊ शकतात. उर्वरित दोन वर्गखोल्यांचे काय करायचे ? असा प्रश्न शाळा व्यवस्थापन समितीसमोर आहे. या सर्व प्रक्रियेत लहान विद्यार्थी मात्र भरडण्याची शक्यता आहे.
येत्या पावसाळ्यापूर्वी इमारत दुरुस्ती न झाल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. वारुळांमध्ये साप राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. इमारत धोकादायक झाल्याने प्रशासन निवडणूक प्रक्रिया घेत नाही. म्हणजे प्रशासनाला एका दिवसासाठी राहणार्‍या निवडणूक अधिकारी व मतदारांची काळजी आहे आणि ते योग्यच आहे पण कायम त्याच धोकादायक इमारतीखाली जीव मुठीत घेऊन राहणार्‍या विद्यार्थ्यांची जराही काळजी नाही, असा आरोप उपसरपंच विजय वालावलकर व ग्रामस्थ यशवंत माधव यांनी केला आहे.

आज वाळविची वारुळे आहेत..आणि निसर्गाच्या अन्नसाखळीनुसार जिथे वाळवी,मुंग्या आणि वारुळ तिथे पुढील मुक्काम सापाचाच..! "शाळेवर कमजोर छप्पर ,पोखरलेल्या भिंतीत वाळवी...तिथे नक्कीच भयभीत होणार ना... विद्यार्थीरुपी कोवळी पालवी..!"

error: Content is protected !!