बिनविरोध स्वरुपांत अध्यक्षपदाची धुरा..!
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील ऐतिहासिक १२५ वर्षाची परंपरा लाभलेल्या नट वाचनालयाची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या निवडणुकीतून बिनविरोध निवडून आलेल्या संचालकातून २०२२ ते २०२४ सालासाठी संचालक मंडळ निवडण्यात आले असून कार्यकारणी पुढीलप्रमाणे. पुन्हा एकदा चालू संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा एस. आर. सावंत यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी सुभाष मोर्ये, सेक्रेटरी-राकेश केसरकर, सहसेक्रेटरी-हेमंत मोर्ये, संचालक म्हणून सुधीर साटेलकर, जगन्नाथ सातोस्कर, शंकर नार्वेकर, सौ. सुस्मिता सावंत, निलेश मोरजकर, आदी ची कार्यकारणी कायम करण्यात आली आहे.
नव्याने निवड झालेल्या संचालक मंडळाचे सेक्रेटरी राकेश केसरकर यांना २०२१ते २०२४ या कालावधीसाठी निवडण्यात आलेल्या कार्यकारी मंडळच्या पुढच्या उद्दिष्ट बाबत विचारले असता केसरकर म्हणाले ” बांदा हे नेहमीच जिल्ह्याच्या सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात आपले योगदान देत आले आहे. तेच योगदान आम्हाला वाचनालयाच्या माध्यमातून द्यायचे आहे. म्हणून बांदा शहराच्या केंद्रस्थानी असलेले हे वाचनालय भविष्यात अद्ययावत करायचे आहे. त्यादृष्टीने पुढच्या काळात आम्ही काम करणार आहोत. यासाठी आधुनिक व सुसज्ज असे सभागृह, विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका, छोट्या मुलांसाठी स्वतंत्र बालविभाग, यासह यापुढच्या दोन वर्षातील विविध योजना कार्यन्वीत करून उत्तम ई वाचनालय सर्वांसाठी तयार करण्याचा मानस आम्ही केला आहे. त्या दुष्टीने प्रयत्न चालू आहेत.”