25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

देवगड मधील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या ‘मराठी भाषा विभागातर्फे’ निबंध स्पर्धा..!

- Advertisement -
- Advertisement -

मराठी भाषा दिनानिमित्त राबवला जातोय मराठी निबंधाचा उपक्रम ..!

देवगड | संतोष साळसकर : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून देवगड मधील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयातील मराठी भाषा विभागातर्फे मराठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालयातील पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित आहे. निबंधाचे विषय १) मराठी भाषेचे संवर्धन : काळाची गरज २) ऑनलाईन शिक्षण ज्ञानोपासाना की आभास ३) माझा आवडता साहित्यिक / माझी आवडती साहित्यिका असे आहेत.
यापैकी एका विषयावर स्पर्धकांनी १००० शब्दांत सुवाच्य अक्षरात निबंध लिहावा निबंध पानाच्या एकाच बाजूला लिहावा पहिल्या पानावर स्पर्धक विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव महाविद्यालयाचे नाव सम्पूर्ण पत्ता संपर्क क्रमांक व्यवस्थित लिहावा. स्पर्धक विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात भरलेल्या फी च्या पावतीची किंवा ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. अन्यथा स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार नाही. निबंधाचे परीक्षण करताना हस्ताक्षर शुद्धलेखन, विषयाची निवड, विषयाची मांडणी मुद्देसूदपणा टापटीप, एकूण परिणाम या मुद्द्यांचा विचार केला जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल प्रथम तीन क्रमांकाचा अनुक्रमे १५०० रू. १००० रू ५०० रू. असे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येईल निबंध पुढील Email ID वर व्यवस्थित स्कॅन करून E mail id : chitnishk.dc@gmail.com वर पाठविणे किंवा प्रा. सौ. हेमश्री किशोर चिटणीस मराठी भाषा विभाग, श्री. स. ह. केळकर महाविद्यालय देवगड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग पिन कोड ४१६६१३ या पत्त्यावर २३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहचतील असे पाठविणे अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक प्रा. हेमश्री चिटणीस ९६०४७२३८१०.

या मराठी संवर्धन उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री.स.ह.केळकर महाविद्यालयाच्या मराठी भाषाविभागामार्फत करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मराठी भाषा दिनानिमित्त राबवला जातोय मराठी निबंधाचा उपक्रम ..!

देवगड | संतोष साळसकर : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून देवगड मधील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयातील मराठी भाषा विभागातर्फे मराठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालयातील पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित आहे. निबंधाचे विषय १) मराठी भाषेचे संवर्धन : काळाची गरज २) ऑनलाईन शिक्षण ज्ञानोपासाना की आभास ३) माझा आवडता साहित्यिक / माझी आवडती साहित्यिका असे आहेत.
यापैकी एका विषयावर स्पर्धकांनी १००० शब्दांत सुवाच्य अक्षरात निबंध लिहावा निबंध पानाच्या एकाच बाजूला लिहावा पहिल्या पानावर स्पर्धक विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव महाविद्यालयाचे नाव सम्पूर्ण पत्ता संपर्क क्रमांक व्यवस्थित लिहावा. स्पर्धक विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात भरलेल्या फी च्या पावतीची किंवा ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. अन्यथा स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार नाही. निबंधाचे परीक्षण करताना हस्ताक्षर शुद्धलेखन, विषयाची निवड, विषयाची मांडणी मुद्देसूदपणा टापटीप, एकूण परिणाम या मुद्द्यांचा विचार केला जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल प्रथम तीन क्रमांकाचा अनुक्रमे १५०० रू. १००० रू ५०० रू. असे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येईल निबंध पुढील Email ID वर व्यवस्थित स्कॅन करून E mail id : chitnishk.dc@gmail.com वर पाठविणे किंवा प्रा. सौ. हेमश्री किशोर चिटणीस मराठी भाषा विभाग, श्री. स. ह. केळकर महाविद्यालय देवगड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग पिन कोड ४१६६१३ या पत्त्यावर २३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहचतील असे पाठविणे अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक प्रा. हेमश्री चिटणीस ९६०४७२३८१०.

या मराठी संवर्धन उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री.स.ह.केळकर महाविद्यालयाच्या मराठी भाषाविभागामार्फत करण्यात आले आहे.

error: Content is protected !!