चिंदर | विवेक परब : आपली सिंधुनगरी चॅनेलचे संचालक आणि मालवण येथील प्राध्यापक श्री. दिनेश किडये आणि मालवण येथील शिक्षिका नेहा गवंडे यांचा शुभविवाह दिनांक १० फेब्रुवारी रोजी मालवणनजिक कोळंब येथे संपन्न झाला.


या विवाहाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांतील आणि मालवण तालुक्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून उभयतांना आशीर्वाद दिले.
मालवण नजिकच्या कोळंब येथील समर्थ हाॅलमध्ये हा सोहळा संपन्न झाला.
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या संपूर्ण परिवारातर्फे उभयतांना वैवाहीक जीवनाच्या विशेष शुभेच्छा देण्यात आल्या.