जय भवानी मंडळ हरकुळ खुर्दचा समाज सात्विक उपक्रम.
सामाजिक कार्यकर्ते महानंदा चव्हाण यांचा पुढाकार..
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : “ऐसा चाहु राज़ मै…..मिले सबन को अन्न, छोटा बडो सब सम बसे… रविदास रहे प्रसन्न..!” या वचनातून जागतिक एकात्मतेचा ध्यास शिकवणारे आणि “मन चंगा तो कटौती में गंगा” असा चित्तशुद्धीचा अनमोल संदेश देत जगाला समानतेची शिकवण देणारे चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती हरकुळ खुर्द येथे समाज सात्विक जागरुकतेने साजरी झाली.
संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त सामाजिक कार्यकर्ते महानंदा चव्हाण यांच्या आयोजनातून जय भवानी मित्रमंडळ हरकुळ खुर्द यांच्या आणि आयडियल नर्सिंग स्कूल,कणकवली यांच्या सहकार्याने हरकुळ खुर्द चव्हाणवाडी येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्या राजलक्ष्मी डीचोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
संत रविदास, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेला गावचे प्रतिष्ठित नागरिक सावकार अविनाश रासम, महानंदा चव्हाण, मंडळाचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अपूर्ण प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी हरकुळ खुर्द च्या सरपंच विदिशा विठ्ठल तेली, उपसरपंच संजय रावले, माजी पं स सदस्य महेंद्र डिचवलकर, आयडियल नर्सिंग स्कूलचे डॉ अनिल ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. या आरोग्य शिबिराचा 116 जणांनी लाभ घेतला. मधुमेह रक्तदाब तसेच जनरल तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार करण्यात आले.
यावेळी मंडळ अध्यक्ष यशवंत भोसले, प्रकाश चव्हाण, मंगेश चव्हाण, संतोष दाभोलकर, मनोहर चव्हाण, सचिन चव्हाण, आदेश भोसले, आकाश चव्हाण, मंगेश चव्हाण, सुभाष चव्हाण, जगदीश चव्हाण, पुरुषोत्तम चव्हाण, राकेश भोसले, रोहन भोसले, विलास भोसले, शांताराम चव्हाण, राजाराम भोसले आदी उपस्थित होते.