मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : ‘नागरीक बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संस्था नेरूर आणि कल्पवृक्ष ग्रामसंघ पेंडूर मोगरणे’ यांच्या वतीने गाईच्या शेणापासून व गोमुत्रापासून धुप, अगरबत्ती, विवीध वस्तू बनविण्याचे एक दिवसीय प्रशिक्षण पेंडुर सावंतवाडा येथे संपन्न झाले.
यावेळी पेंडूर सरपंच सौ.सुनिता मोरजकर, संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल गावडे, सौ. विजया सावंत, सौ.वनिता घाडी, सौ. दक्षता दिपक शिंदे, सौ.मनीषा हिंदळेकर, श्रीमती. सुहासिनी सावंत, सौ. रूपाली माळके, सौ. पुजा पांडुरंग माळके, सौ. सुवर्णा प्रभू, प्रणाली हिंदळेकर, सौ. विना परब, सौ. अमृता सावंत, सौ. जिविता गुराम, सौ. अपेक्षा परब, सौ. विशाखा सावंत, सौ.भार्गवी फोंडेकर, सौ.प्रिया सरमळकर, सौ. मानसी परब, सौ. रुपाली परब, सौ. लतिका कदम, सौ. सुदेष्णा परब, सुवर्णा परब, सौ. रुणाली परब आदी महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाचे पुजन व दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांचे स्वागत प्रिया सरमळकर यांनी तर आभार ज्योती घाडी यांनी मानले.