मालवण | विनीत मंडलिक : मालवणच्या नगरसेविका तृप्ती मयेकर, नगरसेविका सेजल परब , नगरसेवक पंकज सादये या शिवसेनेच्या नगरसेवकांचा मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक करण्याच्या उपक्रम दांडी झालझुल वाडी येथील जयसिंग पराडकर निवास स्थानी आयोजीत करण्यात आला.
या शिबिराला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या शिबिरात सुमारे 65 नागरिकांनी आपला आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक करून घेतला.त्याच प्रमाणे काहींना आपला जुना मोबाईल क्रमांक बदलून नवीन क्रमांक अपडेट करून देण्यात आला. ज्या नागरिकांना आपल्या घरातून बाहेर पडता येत नाही अश्या नागरिकांना घरी जाऊन त्याचा मोबाईल क्रमांक लिंक करून दिला गेला .
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी पोस्ट कर्मचारी श्री अमोल माळकर( बागायत पोस्ट) कुमारी प्राची पाटकर (देवबाग पोस्ट) आणि श्री विजय तारी (वायरी पोस्ट ) यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल नागरिकांनी त्यांचे व आयोजकांचे विशेष आभार मानले.