ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बालनाट्य स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल अव्वल !

बालनाट्य स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल अव्वल !

प्रकाशन: 27 Aug 2024 10:45 PM
वाचन संख्या 173

मालवण /प्रतिनिधी नझीरा शेख: महाराष्ट्र वनविभाग,मॅंग्रो फाऊंडेशन, स्वरांच्या फाऊंडेशन मालवण आणि इको बोक्स व्हेंचर्स यांच्या वतीने बालनाट्य स्पर्धा रविवार दि.25 आगस्ट रोजी मामा वरेरकर नाट्यगृह,मालवण येथे घेण्यात आली.
या वर्षी जिल्ह्यातील तब्बल 13 शाळांनी या स्पर्धेत प्रवेशिका दिल्या होत्या.त्यापैकी 10 संघांना प्रवेश मिळाला व 9संघांचे सादरीकरण झाले.
यात रोझरी इंग्लिश स्कूल,मालवण या शाळेला समुद्रमंथन या नाटकाला लेखन,दिग्दर्शन,नेपथ्य, तांत्रिक, आणि स्त्री अभिनय ही पारितोषिके मिळाली आहेत.
नाटक: समुद्रमंथन
लेखक: मीनू देऊलकर
दिग्दर्शक :सचीन टिकम
प्रकाश योजना: किरण करवतकर
संगीत: देवेन कोळमकर
नेपथ्य :प्रथमेश सामंत
स्त्री अभिनय :आध्या ओरसकर
यातील इतर कलाकार:अद्वैत टिकम, केतकी मेस्त्री कृपा केणी, चार्वी मोंडकर, तनिष ठाकूर, आदित्य गोगटे, दिनेश थापा व रेवा जोशी.
रोझरी स्कूलच्या या यशाबद्दल आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल कडून हार्दिक अभिनंदन.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स