ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रत्नागिरी जिल्ह्यात 5 ठिकाणी नवीन सीएनजी स्टेशन उभारणार

रत्नागिरी जिल्ह्यात 5 ठिकाणी नवीन सीएनजी स्टेशन उभारणार

प्रकाशन: 06 Aug 2024 09:22 PM
वाचन संख्या 58

रत्नागिरी |

नैसर्गिक वायू म्हणजेच सीएनजीचा वापर इंधन म्हणूनकरण्याकडे कल वाढला असून ही हरित चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर मोक्याच्या ठिकाणी सीएनजी स्टेशन्स उभारली जाणार आहेत.इंधन म्हणून डिझेल-पेट्रोलच्या गगनाला भिडलेल्या किमती, त्यांचामर्यादित साठा या सर्वांचा विचार करून नैसर्गिक वायूचा वापर करण्याकडे कल वाढू लागला आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात सीएनजीचा पुरवठा होऊ लागला. सुरुवातीला रत्नागिरीसह मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी सीएनजीचा पुरवठा केला जात होता. सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) पर्यावरणपूरक असल्यामुळे प्रदूषण रोखण्यात त्याची मदत होत आहे. तुलनेने तो स्वस्तही आहे. वाहनांमध्ये इंधन म्हणून वापर करण्याबरोबरच रत्नागिरी शहरापासून तो घरगुती वापरासाठी पीएनजी (पाइप नॅचरल गॅस) पुरवला जाऊ लागला आहे. स्वयंपाकासाठी घरगुती गॅस म्हणून त्याचा पुरवठा पाच वर्षांपासून होऊ लागला आहे. आता या पर्यावरणपूरक गॅसचे सेवाक्षेत्र व्यापक केले जाणार आहे.

याआधी जिल्ह्यात अशोका गॅस कंपनीकडून ही सेवा पुरवली जात होती. आता मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या महानगरांमध्ये आधीपासूनच ही सेवा पुरवणाऱ्या महानगर गॅस या मोठ्या कंपनीने आधीच्या सेवा पुरवठादार कंपनीचा ताबा घेतला आहे. नव्या महानगर गॅस कंपनीने जिल्ह्यात पाच ठिकाणी नव्याने सीएनजी स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने जिल्ह्यातील ही नवी सीएनजी स्टेशन उभारण्यासाठी त्या त्या ठिकाणच्या लोकांना स्वतःचे सीएनजी स्टेशन उभारण्याची संधी देताना ४ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविले आहेत. खेड, चिपळूण, आरवली, लांजा (हातखंबा ते लांजा) आणि साखरपा अशा पाच ठिकाणी नवीन सीएनजी स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित आहे

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स