ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ज्यांनी आम्हाला प्राथमिक शिक्षण देऊन घडविले त्यांचा सन्मान करणे, हे आमचे कर्तव्यच : राजेंद्र मनोहर पेडणेकर.

ज्यांनी आम्हाला प्राथमिक शिक्षण देऊन घडविले त्यांचा सन्मान करणे, हे आमचे कर्तव्यच : राजेंद्र मनोहर पेडणेकर.

प्रकाशन: 02 Jun 2024 07:47 PM
वाचन संख्या 150

सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिक्षक उत्तम आनंदा सूर्यवंशी गुरुजी यांचा माऊली मित्रमंडळाच्या वतीने सन्मान.

कणकवली | प्रतिनिधी : कणकवलीतील माऊली मित्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते, आज २ जून रोजी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिक्षक श्री. उत्तम आनंदा सूर्यवंशी यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सुर्यवंशी गुरूजी यांच्या पत्नी, आई, सौ वैशाली शाम सूर्यवंशी उपस्थित होते.

यावेळी माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सांगितले की, आदरणीय श्री. उत्तम आनंदा सुर्यवंशी गुरुजी यांनी १९८९ साली प्राथमिक शिक्षण देऊन असंख्य विद्यार्थी घडविले, २००८ साली गुरूजींनी मुख्याध्यापक म्हणून , तसेच २००९ सालापासून त्यांनी केंद्रप्रमुख म्हणून शिक्षणाची सेवा केली. गेली ३५ वर्षे त्यांनी विद्यार्थी घडविण्यासाठी आपले आयुष्य वेचले. अशा या थोर व्यक्तिमत्वाला सन्मानित करताना आम्हाला विषेश आनंद होत आहे. ज्यांनी आम्हाला प्राथमिक शिक्षण देऊन घडविले त्यांचा सन्मान करणे, हे आमचे कर्तव्यच असल्याचे राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सांगितले.

यावेळी माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी, सुभाष उबाळे उपस्थित होते. माऊली मित्र मंडळाचे उपस्थित पदाधिकारी व यांनी सुर्यवंशी गुरूजींना व त्यांच्या कुटुंबियांना भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. या सन्मानाबद्दल श्री. उत्तम आनंदा सूर्यवंशी गुरुजी व कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स