ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सावध तो सुखी…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सावध तो सुखी…!

प्रकाशन: 21 May 2024 10:24 AM
वाचन संख्या 290

दरड कोसळायचे धोके असलेल्या ठिकाणांचा पावसाळ्यापूर्वीच पहाणी करुन आढावा घेणे आवश्यक : सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर.

कणकवली | अविनाश गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी, २०२४ चा पावसाळा तथा मान्सून पाऊस सुरु होण्यापूर्वीच्या नियोजनाबद्दल त्यांचे विचार मांडताना, दरड दुर्घटना टाळण्यासाठी, संभाव्य दरड प्रवण ठिकाणांची पहाणी करुन संबंधित यंत्रणांनी त्याबाबतचा अधिकृत आढावा घ्यायची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. अशाप्रकारची पहाणी आधीच केली गेलीअसेल तर ते प्रशंसनीय आहे असेही त्यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात येणारे घाट मार्ग, रेल्वे रुळांच्या आसपासचे संवेदनशील डोंगर टेकड्या, दुर्गम भागातील विविध वस्ती वाड्यांतील दरड कोसळायचे धोके असलेली ठिकाणे यांना पावसाळ्या पावसाळ्या आधीच हेरून, तिथे दरड कोसळायला प्रतिबंधात्मक नियोजन करणे किंवा अन्य मदतगार उपाय योजनांचा आता गांभिर्याने विचार व्हायलाच हवा अशा भीषण घटना मागिल काही पावसांत घडल्या आहेत त्यामुळे ‘सावध तो सुखी’ अशा तत्वावर यंत्रणांनी काम करणे आवश्यक असल्याचे मत त्यानी व्यक्त केले आहे. अनुचित दुर्घटना घडल्यानंतर एकमेकांकडे बोट दाखवणे आणि दुर्घटनाग्रस्तांची नंतर मलम पट्टी करण्यापेक्षा खबरदारी घेणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

वर्षा पर्यटनासाठी देखील जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात यावेत यासाठी रस्तेमार्ग सुरक्षित असणे व सुरळीत असणे महत्वाचे आहे असेही सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सांगितले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स