ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजप नेते व माजी खासदार निलेश राणेंच्या हस्ते जिल्हा बँक मसुरे शाखेचे स्थलांतरीत जागेत उदघाटन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजप नेते व माजी खासदार निलेश राणेंच्या हस्ते जिल्हा बँक मसुरे शाखेचे स्थलांतरीत जागेत उदघाटन.

प्रकाशन: 28 Dec 2023 06:53 AM
वाचन संख्या 113

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही ग्रामीण भागाची आर्थिक नाडी आहे. जिल्हा बँकेचे नाव राज्यभर अभिमानाने घेतले जाते. राणे साहेबांच्या विचारातून ही बँक पारदर्शक कारभार करत आहे. पुढील २५ वर्षे राणे साहेबांच्या विचारातुन ही बँक चालावी. या बँकेचा सर्वात जास्त फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे. अनेक नवीन योजना बँक चालू करते आहे. यासाठी अध्यक्ष मनिष दळवी यांचे अभिनंदन करतो. यापूर्वीचे अध्यक्ष अडचणी सांगायचे पण मनिष दळवी अडचणीतून मार्ग काढतात असे प्रतिपादन माजी खासदार डॉ निलेश राणे यांनी मसुरे येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक मसुरे शाखेचे नवीन जागेत उदघाटन माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँक अध्यक्ष मनिष दळवी, संचालक मेघनाथ धुरी, बाबा परब, उद्योजक डॉ दीपक परब, अशोक सावंत, सौ सरोज परब, सरपंच संदीप हडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. माजी खासदार निलेश राणे म्हणाले, कोकण बँकिंग क्षेत्रात खुप मागे आहे. सगळ्यांनी येथील बँकेत ठेवी वाढाव्यात यासाठी योगदान ध्यावे. बँक टिकवणे मोठे काम आहे. या भागातील जनतेने आपण काही शाखेला देणे लागतो या भावनेने काम करावे असे आवाहन केले. बँक अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले, या तालुक्यातील दुसरी शाखा या वर्षी स्थलांतर होत आहे. रस्त्या लागत सुसज्ज जागा उपलब्ध झाल्याने स्थलांतर होत आहे. डॉ. निलेश राणे यांनी याबाबत नवीन जागेत स्थलांतर करण्याबाबत प्रस्ताव ठेवला होता. व्यवसाय कमी असून देखील या भागातील शेतकरी व व्यवसाईक यांच्या साथीने येत्या वर्षात ४० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करू शकू. वर्षभरात अनेक योजना जिल्हा बँकेने सर्वांसाठी आणल्या आहेत. डिजिटल बँकिंग योजने सह इंटरनेट बँकिंग चालू करणारी देशातील पहिली सहकारी बँक ठरणार आहे. डिपॉझिट प्रति महिना ५० कोटी येत आहे. ठेवी येण्या बरोबरच अनेक नवीन ग्राहक जोडले जात आहेत. शेतकऱ्यांच्या घरा पर्यंत जात सुविधा देत आहोत. येत्या मार्च पर्यंत सहा हजार कोटी व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. उद्योजक डॉ दीपक परब म्हणाले, ३४ वर्षांनी बँक नवीन जागेत येत आहे. जिल्हा बँक पाच हजार कोटी पेक्षा जास्त व्यवसाय करत आहे. ग्रामीण भागात बँक सुविधा देण्याचे काम येथील कर्मचारी देत आहेत. येथील कर्मचारी ग्राहकांना सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असतात. मसुरे गावाला पर्यटनातून सुबत्ता मिळण्यासाठी याभागातील कांदळगाव ते चांदेर मागवणे (सड्यावरून) रस्त्याला चालना मिळावी आणि मसुरे गावचे नाव ग्रामपंचायत दप्तरी पुन्हा मसुरे मर्डे केले जावे अशी मागणी परब यांनी माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्याजवळ केली. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले.

सरव्यवस्थापक देवानंद लोकेगावकर,वेरली सरपंच धनंजय परब, डॉ विश्वास साठे, प्रफुल्ल प्रभू, महेश बागवे, छोटू ठाकूर, लक्ष्मी पेडणेकर, जितेंद्र परब, संग्राम प्रभुगावकर, जगदीश चव्हाण, तात्या हिंदळेकर, शिवाजी परब, संतोष पालव, बँक सरव्यवस्थापक देवानंद लोकेगावकर, पी. डी. सामंत, शरद सावंत, पूर्णांनंद सरमळकर, स्वप्नील केळुसकर, शाखा धिकारी संतोष गावकर, एस. एल. ठाकूर, विनीत लुडबे, एम. के. माळकर, मामा पेडणेकर, श्री एकनाथ तावडे, पांडुरंग ठाकूर, ओंकार ठाकूर तसेच बँक ग्राहक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स