आचरा येथे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केले पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवारांना विशेष मार्गदर्शन.
उप जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा पदाधिकारी रणजित देसाई, तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्यासहीत असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित.
श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार उपस्थित.
मालवण | सुयोग पंडित ( आचरा प्रतिनिधी | प्रसाद टोपले ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२३च्या पार्श्वभूमीवर आता प्रचाराच्या अंतिम टप्प्याच्या सुरवातीला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आचरा गांवाला भेट देत स्थानिक व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विशेष मार्गदर्शन केले. आचरा तिठा जवळील भाजप व शिवसेना पुरस्कृत श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनेलच्या प्रचार कार्यालयात, ३१ ऑक्टोबरला सायंकाळी ५ :३० वाजता त्यांचे आगमन झाले.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले की ‘पंचायत ते पार्लमेंट’ असा भाजप व मित्र पक्षांचा सुव्यवस्थित घडीचा आराखडा ठरलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहुतांश भारतीय जनतेचा थेट व मनोमन पाठिंबा आहे. ‘आयुष्मान भारत’ सारख्या लोकांसाठी उपयुक्त अशा हक्काच्या योजना देणारे सरकारच लोकांना हवे आहे. भाजप व मित्र पक्षांच्या सकारात्मक सामाजिक कृती व गोष्टी आपण सर्वांनी सर्व मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे जेणेकरून विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारी उपलब्ध आहे असा संदेश पोहोचेल. श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनेलच्या विजयासाठी आचरा येथील सर्व भाजप व संबंधीत असलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. प्रभाकर सावंत यांनी उपस्थित प्रत्येक उमेदवाराशीही संवाद साधला. सरपंच पदाचे उमेदवार जेराॅन फर्नांडिस यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर उप जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून लोकांची झालेली कामे पहाता आता देशात सर्व स्तरांवर भाजप व मित्रपक्षांचाच झेंडा फडकणार यात शंकाच नसल्याचे प्रतिपादन केले. त्यानंतर तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आचरा सरपंच पदाचे उमेदवार जेराॅन फर्नांडिस यांची विशेष प्रशंसा करताना त्यांची जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती ही कामगिरी असूनही ते कार्यकर्ते व पक्षाच्या सक्षमीकरणासाठी पुन्हा स्थानिक स्तरावर येऊन ग्रामपंचायतीला प्राधान्य देत आहेत हे सच्च्या आदर्शवत कार्यकर्त्याचे मोठेपण असल्याचे सांगितले.
यावेळी संरपच पदाचे उमेदवार जेराॅन फर्नाडीस, अशोक बागवे, राजन पांगे, उदय घाडी, माजी पं. स. सभापती निलीमा सांवत सांवत, जिल्हा सचिव रणजित देसाई, अभिजीत सांवत, बाबू परूळेकर, सुहास परब, महेश मांजरेकर, मंदार सरजोशी, शिवसेना तालुका अध्यक्ष महेश राणे, विश्वास गांवकर, चावल मुजावर, बाबू कदम, चंदू कदम, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, सचिन हडकर, संतोष कोदे, पंचायत समिती उपसभापती राजू परूळेकर,बाळू वस्त, अवधूत हळदणकर तसेच सदस्य पदाचे उमेदवार सारिका नंदकिशोर तांडेल, प्रीयता पांडूरग वायगणकर, मुजफ़्फर मुज़ावर, प्राजक्ता देसाई, सायली सांरग, योगेश गांवकर, श्रुति सावंत, चंद्रकांत कदम, महेंद्र घाडी, पंकज आचरेकर,
किशोरी आचरेकर, संतोष मिराशी आणि असंख्य भाजप शिवसेना पदाधिकारी तसेच श्री देव रामेश्वर पॅनेलचे कार्यकर्ते व प्रचारक उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)