दसऱ्याच्या मुहूर्तावर श्री मनुदेवी ग्रामस्थ मंडळ वायंबोशी, मुंबई (रजि.) मंडळाची स्थापना.
अध्यक्षपदी अजित अडूळकर तर सचिवपदी विकास अडूळकर यांची निवड.
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या वायंबोशी गांव येथील सर्व ग्रामस्थांनी मिळून दसऱ्याच्या मुहूर्तावरती , श्री मनुदेवी ग्रामस्थ मंडळ वायंबोशी, मुंबई (रजि) या मंडळाची स्थापना केली. गांवातील ज्येष्ठ वरिष्ठ व्यक्तींना प्राधान्य देत त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मंडळाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी अध्यक्ष श्री.अजित भा. अडुळकर, सचिव कु. विकास प्रकाश अडुळकर यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले व मंडळाच्या मार्फत गांवच्या विकासाची कामे करण्यासाठी नेहमी तत्पर असू असे आश्वासन दिले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)