ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आचरा बंदर मारुती घाटी फाट्यावर आढळला बिन मुंडक्याचा बकरा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आचरा बंदर मारुती घाटी फाट्यावर आढळला बिन मुंडक्याचा बकरा..!

प्रकाशन: 22 Oct 2023 11:46 AM
वाचन संख्या 259

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथील मारुती घाटी फाट्यावर बिना मुंडक्याचा बकरा आढळल्याने चर्चेला उधाण आले आहे. आचरा मालवण रस्त्यालागतच्या मारुती घाटी फाट्यावर शनिवारी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान एक मुंडके छाटलेला बकरा अगदी रस्त्याच्या कडेला टाकलेला दिसून आला होता. आचरा – मालवण रस्ता व मारुती घाटी रस्ता असे जेथे तीन रस्ते एकत्रित होतात अशा ठिकाणी हा बकरा आढळला आहे. या रस्त्याने ये जा करणाऱ्या वाट सुरूना हा मुंडके छाटलेला बकरा दिसला.

जंगली श्वापदाने जर तो मारला असता तर मुंडके खालेल्या अवस्थेत आढळले असते मात्र दिसून येत असलेला बकरा मुंडके कापलेल्या अवस्थेत दिसत होता. तसेच बकरा टाकलेल्या ठिकाणी रक्ताचे शिंतोडे व डाग नसल्याने तो बकरा दुसऱ्या ठिकाणी मारून मग आणला असावा असा अंदाज वर्तवला जात होता आणि नेमका ‘तिठ्यावर’ तो दिसला म्हणून आश्चर्य व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स