ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आचरा विभाग युवासेना व सिंहगर्जना गृप आयोजीत पारंपरीक नारळ लढवीणे स्पर्धेला तुफानी प्रतिसाद ; बंटी पालव ठरले अव्वल तर सागर परुळेकर यांना उपविजेतेपद.

आचरा विभाग युवासेना व सिंहगर्जना गृप आयोजीत पारंपरीक नारळ लढवीणे स्पर्धेला तुफानी प्रतिसाद ; बंटी पालव ठरले अव्वल तर सागर परुळेकर यांना उपविजेतेपद.

प्रकाशन: 26 Aug 2023 01:28 AM
वाचन संख्या 310

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मालवणचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, विभाग प्रमुख समीर लब्दे व आचरा विभाग शिवसेना पदाधिकारी व युवासैनिक तसेच शिवसैनिकांची उपस्थिती.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व इतर मान्यवर यांनी स्पर्धेची अनुभवली चुरस.

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथे काल २५ ऑगस्टला शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष युवासेना व सिंहगर्जना गृप यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरीक नारळ लढविणे स्पर्धा अतिशय तुफानी जल्लोष प्रतिसादात संपन्न झाली. पारंपारीक नारळी पोर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजीत या स्पर्धेत आचरा परिसरातील ज्येष्ठ व युवापिढीचा एकत्रीत आधुनीक सांस्कृतीक उत्साह आकर्षण ठरला.

मालवणचे माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक मंदार केणी तसेच इतर मान्यवर यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या विशेष उपस्थितीत या स्पर्धेला प्रोत्साहन मिळाले. या स्पर्धेत बंटी पालव हे अव्वल ठरले तर सागर परुळेकर यांना उपविजेतेपद मिळाले.

यावेळी विनायक परब, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, श्याम घाडी, नारायण कुबल, नितीन घाडी, सचिन परब, प्रशांत गांवकर, शिवगर्जना अध्यक्ष हर्षद धुरी, संकेत पाटील, गणेश तोंडवळकर, अनिल गांवकर, राजू हिर्लेकर, श्रीकांत बागवे, अविराज परब, केदार परूळेकर, सचिन रेडकर, रुपेश पाटकर, आशु मयेकर, नारायण परब, पुष्पक घाडीगांवकर, यश मिराशी, संतोष पाटणकर, मिलिंद चिंदरकर, हेमंत मोंडकर, गणेश चव्हाण, अक्षय रेवंडकर आणि असंख्य नागरीक व शिवसैनिक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स