ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देशभरातील बँका सप्टेंबर महिन्यात जवळपास अर्धा महिना राहणार बंद !
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

देशभरातील बँका सप्टेंबर महिन्यात जवळपास अर्धा महिना राहणार बंद !

प्रकाशन: 25 Aug 2023 11:15 AM
वाचन संख्या 151

मुंबई | ब्युरो न्यूज : देशातील बँका सप्टेंबर २०२३ या महिन्यात एकूण १६ दिवस बंद राहणार आहेत. पुढील महिन्यात अनेक सण-उत्सव आहेत. त्यामुळं बँका बंद राहणार आहेत. पुढील महिन्यात एकूण १६ दिवस सुट्ट्या आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यात पुढील महिन्यातील प्रादेशिक सुट्ट्या, शनिवार, रविवारचा समावेश आहे. रविवारच्या एकूण ४ सुट्ट्या असतात. त्यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. त्यामुळे या ६ सुट्ट्या निश्चित असणार आहेत. त्यात अजून काही दिवस बँका बंद राहणार आहेत.

सप्टेंबर महिन्यात बँकाच्या सुट्ट्यांची यादी खालील प्रमाणे आहे.

६ सप्टेंबर, बुधवार – श्री कृष्ण जन्माष्टमी

७ सप्टेंबर, गुरुवार – जन्माष्टमी (श्रावण वद-8) / श्री कृष्ण अष्टमी

८ सप्टेंबर, सोमवार – वर्षसिद्धी विनायक व्रत / विनायक चतुर्थी

१९ सप्टेंबर, मंगळवार – गणेश चतुर्थी / संवत्सरी (चतुर्थी पक्ष)

२० सप्टेंबर, बुधवार – गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) / नुखाई

२२ सप्टेंबर, शुक्रवार – श्री नारायण गुरु समाधी दिन

२३ सप्टेंबर, शनिवार – महाराजा हरिसिंह जी यांचा जन्मदिन,

२५ सप्टेंबर, सोमवार – श्रीमंता शंकरदेव यांची जयंती,

२७ सप्टेंबर, बुधवार – मिलाद-ए-शरीफ (प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस)

२८ सप्टेंबर गुरुवार – ईद-ए-मिलाद/ईद-ए-मिलादुन्नबी – (प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिन) (बारा वफत)

२९ सप्टेंबर शुक्रवार- -उल-नबी नंतर ईद-ए-मिलाद इंद्रजात्रा

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स