ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अन्यथा मालवणच्या पंचायत समिती कार्यालयातच शाळा भरवणार ; श्रावण ग्रामस्थ व पालकांचा संताप.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अन्यथा मालवणच्या पंचायत समिती कार्यालयातच शाळा भरवणार ; श्रावण ग्रामस्थ व पालकांचा संताप.

प्रकाशन: 01 Jul 2023 05:26 AM
वाचन संख्या 322

श्रावणातील शाळेला टाळे ; संतप्त ग्रामस्थ व ांनी शिक्षण विभागावर केला बेफिकीरीचा आरोप.

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या श्रावण गांवातील ‘महात्मा गांधी विद्यालय’ शिक्षक नियुक्ती साठी ग्रामस्थ आणि ांनी पाच दिवस आंदोलन करूनही शिक्षण विभागाकडून शिक्षक दिलाच गेला नाही. सबब विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कोण भरुन देणार असा सवाल करत तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी किंवा गटशिक्षण अधिकारी श्री माने हे नुसती बघ्याची भुमिका घेत असल्याचा आरोप करत काल ३० जूनला संतप्त ग्रामस्थ व हतबल ांनी अखेर शाळेला टाळे ठोकले.

या शाळेत एकुण ५ शिक्षकांपैकी ४ शिक्षक आहेत. यापैकी एक रजेवर तर नविन आलेले अमित पवार यांना मुख्याध्यापकांना मोबाईलवर आलेल्या फक्त एका संदेशावरुन मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शिवराम परब यांना कल्पनाही न देता, शिक्षक अमित पवार यांना कामगिरीवर जाण्यास कार्यमुक्त केले. प्रत्यक्ष ७ वर्ग व दोन महिला शिक्षक…! यामुळे मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याची विचारणा केली असता तालुका किंवा जिल्हा पातळीवरुन उत्तरे देण्यास टाळाटाळ होत आहे. श्रावण शाळेचे कायमस्वरूपी शिक्षक अमित पवार हे कामगिरी म्हणुन दुसऱ्या शाळेत पाठविले, याबाबत सर्व ांनी आंदोलन करून सोमवारी २६ जून पासून मुलांना शाळेत पाठवले नाही. याबाबत ५ दिवस होऊनही केंद्र प्रमुख देऊ जंगले यांच्या कडून कोणतीही दखल घेतली जात नाही नसून केंद्र प्रमुख याला जबाबदार आहेत असे आलोप शाळा समिती अध्यक्ष व करत आहेत. एकंदरीत श्रावण शाळेला कोणीच वाली नसल्याने काल ३० जूनला ग्रामस्थ व ांनी शाळेला टाळे लावून आंदोलन तीव्र केले आहे.

शिक्षण विभागाने लवकरच प्रशासनाशी चर्चा करुन यावर तोडगा काढत शिक्षक अमित पवार यांना मुळ शाळेवर हजर करावे अशी मागणी होत आहे. अन्यथा राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना निवेदन देऊन, सोमवार पासुन पंचायत समिती मालवण कार्यालयातच शाळा भरवणार असा इशारा श्रावण शाळेचे अध्यक्ष शिवराम परब, व ग्रामस्थांनी दिला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स