ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
केंद्रशाळा मसुरे क्र. शाळेच्या ८० वर्षाची माजी चिरतरुण विद्यार्थिनी श्रीम.सीमा सावंत/साटम (दिल्ली)यांची मसुरे नं.१ शाळेला एक लाखाची शैक्षणिक मदत.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

केंद्रशाळा मसुरे क्र. शाळेच्या ८० वर्षाची माजी चिरतरुण विद्यार्थिनी श्रीम.सीमा सावंत/साटम (दिल्ली)यांची मसुरे नं.१ शाळेला एक लाखाची शैक्षणिक मदत.

प्रकाशन: 22 Jun 2023 01:36 PM
वाचन संख्या 20

मसुरे | सौ. प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे नं.१ केंद्रशाळेच्या माजी विद्यार्थिनी श्रीम. सीमा साटम पूर्वाश्रमीच्या सीमा कानू सावंत- वय ८० यांनी आपला भाचा निवृत्त तलाठी मसुरे श्री.धनंजय सावंत यांचे मार्फत मसुरे नं.१ शाळेला भरघोस अशी एक लाख रुपयांची शैक्षणिक मदत दिली.
श्रीम.सीमा साटम या भारतीय आर्मीचे लेप्टनंट जनरल कुलभूषण गवस यांच्या सासू होत.
सुमारे 160 वर्षे पूर्ण होत आलेल्या मसुरे नं.१ शाळेत सुरु असलेले विविध उपक्रम,शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मिळालेले अपूर्व यश,शिक्षकांची मेहनत व योगदानाची माहिती श्री धनंजय सावंत यांचे मार्फत श्रीमती सीमा साटम यांच्या कानावर गेली. आणि ८० वर्षाच्या या माजी विद्यार्थिनीने आपल्या शाळेबद्दल असलेले प्रेम,जिव्हाळा,आपुलकी या भावनेने शाळेला शैक्षणिक मदत केली.
श्री धनंजय सावंत यांच्यामार्फत मसुरे नं.१ शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी शिवराज सावंत,नुतन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.शितल शैलेश मसुरकर,उपाध्यक्ष श्री.संतोष दुखंडे,माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सन्मेष मसुरेकर यांजवळ सुपूर्द केली.यावेळी शिक्षणप्रेमी सदस्य सौ.लक्ष्मी दत्तप्रसाद पेडणेकर,श्री.विनोद सातार्डेकर सर,श्री.गोपाळ गावडे सर,सौ.रामेश्वरी मगर मँडम व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर एक लाख रुपये रक्कम ठेव स्वरुपात ठेवण्यात येऊन दरवर्षी मिळणाऱ्या व्याजातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली जाणार आहे.श्रीम.सीमा साटम यांनी दिलेल्या या शैक्षणिक मदतीसाठी मसुरे नं.१ शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ,माता पालक संघ व तमाम मसुरे ग्रामस्थ यांज कडून विशेष कौतुक होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स