ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला जाईल ; ह्युमन राईटस् असो. फाॅर प्रोटेक्शनचे वैभववाडी नूतन तालुकाध्यक्ष संजय शेळके यांची ग्वाही.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला जाईल ; ह्युमन राईटस् असो. फाॅर प्रोटेक्शनचे वैभववाडी नूतन तालुकाध्यक्ष संजय शेळके यांची ग्वाही.

प्रकाशन: 27 Apr 2023 02:25 PM
वाचन संख्या 344

संघटनेची वैभववाडी तालुका कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी पत्रकार संजय शेळके, उपाध्यक्षपदी ॲड.विवेक गोखले, सचिवपदी अभयसिंह रावराणे तर जनसंपर्क अधिकारी ॲड.विक्रमसिंह काळे

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका ‘ह्यूमन राईट असोशिएशन फाॅर प्रोटेक्शन’ या संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी पत्रकार संजय शेळके तर उपाध्यक्ष म्हणून ॲड.विवेक गोखले तसेच सचिवपदी अभयसिंह रावराणे यांची निवड करण्यात आली आहे. ह्यूमन राईट असोशिएशन फाॅर प्रोटेक्शन या संघटनेच्या वैभववाडी तालुक्याची नुतन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी विशेष बैठक प्रकाश माईणकर यांच्या निवासस्थानी पार पडली.

या बैठकीत नवीन तालुका कार्यकारिणीच्या निवड करण्यासंदर्भात विचारविनिमय करून कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
यावेळी संघटनेचे निरिक्षक म्हणून उपस्थित असलेले जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संजय खानविलकर यांनी संघटनेच्या कार्याविषयी माहिती देऊन त्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यातील अनेक सार्वजनिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी व अन्यायग्रस्तावरती होणारे अन्याय तसेच त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक बांधिलकी स्वीकारून संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कृतीतून कार्याचा ठसा उमटवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी कार्य तत्परतेने कार्य करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन याप्रसंगी केले.तसेच संघटनेच्या कार्यप्रणाली विषयीची माहिती दिली.

यावेळी चर्चा करून सात जणांची कार्यकारिणीची नव्याने निवड करण्यात आली.ती कार्यकारीणी पुढील प्रमाणे- नूतन तालुका अध्यक्ष म्हणून पत्रकार- संजय शेळके, उपाध्यक्ष- ॲड.विवेक गोखले, सचिव म्हणून अभयसिंह रावराणे, निरिक्षक- प्रकाश माईणकर, जनसंपर्क अधिकारी- ॲड.विक्रमसिंह काळे, संघटक- सचिन सावंत, महिला संघटक- म्हणून सौ.अक्षता जैतापकर यांची निवड करण्यात आली.

नूतन तालुकाध्यक्ष संजय शेळके यांनी उपस्थितांचे स्वागत करुन संघटनेने आपल्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती संघटनेच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन वैभववाडी तालुक्यातील बऱ्याचशा प्रलंबित समस्या व प्रश्नांबाबत निश्चितच आवाज उठवून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही याप्रसंगी दिली. या निवडीच्या वेळी निरिक्षक म्हणून संघटनेचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पत्रकार संजय खानविलकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. शेवटी तालुका निरिक्षक प्रकाश माईणकर यांनी सर्वांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स