ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणच्या 'द सिंधुदुर्ग डायसीझन एज्युकेशनल ट्रस्ट'स् संचलीत रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये' शिक्षक व शिक्षकेतर पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.       ( नोकरी संदर्भ जाहीरात)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणच्या 'द सिंधुदुर्ग डायसीझन एज्युकेशनल ट्रस्ट'स् संचलीत रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये' शिक्षक व शिक्षकेतर पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ( नोकरी संदर्भ जाहीरात)

प्रकाशन: 16 Apr 2023 12:16 PM
वाचन संख्या 414

मालवण | नझिरा शेख़: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूल येथे शिक्षक व शिक्षकेतर पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान घेण्यात येणार आहेत. यासाठीच्या अर्जांच्या सादरीकरणाची अंतीम तारीख दिनांक २४ एप्रिल २०२३ असून ते अर्ज ‘रोझरी इंग्लिश स्कूल, कचेरी रोड,मालवण, जि.सिंधुदुर्ग’ येथे द्यायचे आहेत.
या बाबत अधिक माहितीसाठी ०२३६५-२५३३४९, ७५८८९०४९६३, ७५२७३२५७९५ या क्रमांकांशी संपर्क साधावा.

ज्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत ती पदे खालील प्रमाणे आहेत.

१) इंग्रजी माध्यम शिक्षक/शिक्षिका ( एच.एस.सी.डि.एड.) – १ जागा.

२) मराठी व हिंदी शिक्षक / शिक्षिका ( एच.एस.सी.डि.एड.)- ३ जागा.

३) क्रीडा शिक्षक ( बी.पी.एड.) -१ जागा.

४) संगणक शिक्षक ( बी. एस.सी. कंप्युटर आय.टी., बि.सी.ए./एम.सी.ए.)- १ जागा.

५) लिपीक तथा क्लर्क ( बी.काॅम,टॅली,एम.एस.सी.आय.टी.) -१ जागा.

६) शिपाई (एस.एस सी.) -२ जागा.

इच्छुक उमेदवारांनी आपल्या हस्ताक्षरातील अर्ज, बायोडाटा (रेज्युमी),सर्व कागदपत्रांच्या नक्कल प्रतीसहीत ( झेराॅक्ससहीत) २४ एप्रिल २०२३ पूर्वीपर्यंत रोझरी इंग्लिश स्कूल, कचेरी रोड , कार्यालयात सादर करायचे आहेत अशी माहिती रोझरी इंग्लिश स्कूल द्वारे देण्यात आली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स