ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
राज्य - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

राज्य - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर.

प्रकाशन: 02 Apr 2023 09:10 PM
वाचन संख्या 179

कोल्हापूरात राज्य कार्यकारिणीच्या सभेत केले प्रतिपादन.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कोल्हापूर येथे नुकतेच शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगांवकर यांनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या राज्य कार्यकारिणीच्या सभेला संबोधीत केले. यावेळी त्यांनी प्रतिपादन केले की राज्य- राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या विधिमंडळात मांडून त्या पूर्ण करण्यासाठी माझ्या वतीने शक्य तेवढे सगळे प्रयत्न करीन महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची डिरेक्टरी तयार करा, म्हणजे त्या शिक्षकांची माहिती राज्यातील इतर शिक्षकांना होईल. या शिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा त्यांच्या शाळेपुरता मर्यादित न राहता राज्याला होईल. राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त संघाच्या दि प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या राज्य कार्यकारणी सभेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले.

संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री.सुभाष जिरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथे ही सभा संपन्न झाली. यावेळी बोलताना अध्यक्ष जिरवणकर म्हणाले, आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील मंत्री महोदय आमदार यांना निवेदन आपले प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून द्यावेत. प्रास्ताविक राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे सिंधुदुर्ग यांनी केले त्यामध्ये त्यांनी संघटनेचे आतापर्यंतची झालेली वाटचाल विशद केली .राज्य कार्यकारिणीच्या मागील सभांचा आढावा सरचिटणीस अनंता जाधव पुणे यांनी घेतला. या सभेमध्ये सन २०२२ मध्ये राज्यातील राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि सेवानिवृत्त राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान आमदार प्रा. जयंत तासगावकर हस्ते करण्यात आला.यावेळी डॉ.संजय जगताप कोल्हापूर यांची संघटनेच्या राज्य प्रसिद्ध प्रमुख म्हणून निवड करण्यात आली तर डॉ.श्रीकांत पाटील यांची कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष, संजय मगदूम यांची कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी निवड करण्यात आली.

यावेळी सिंधुदुर्ग संघाचा अहवाल जिल्हाध्यक्ष श्री.शिवराज सावंत यांनी राज्याध्यक्ष यांना सादर केला.या कार्यकारणी सभेसाठी गोंदिया पासून सिंधुदुर्ग पर्यंत जवळपास दोनशे राष्ट्रीय,राज्य आदर्श शिक्षक उपस्थित होते.ही सभा यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शाहू चौगुले,सरचिटणीस नवनाथ व्हरकट, कार्याध्यक्ष संजय जगताप , कोषाध्यक्ष हिंदुराव मातले, विभागीय अध्यक्ष सतीश चिपरीकर ,राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे,डॉ. श्रीकांत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यकारणी सभेसाठी एस.के.मठपती मुंबई उच्च न्यायालय वकील, सुनील एडके चेअरमन शिक्षक बँक, रामदास झेंडे संचालक शिक्षक बँक,शशिकला पाटील, मच्छिंद्र कुंभार, सुनील सुतार,विमल चौगुले, सुमित्रा येसने,माधव वायचळ,सुनील गुरव, नागोराव तायडे, प्रदीप शिंदे,शिवराज सावंत,आनंद जाधव,संदीप शिंदे,नंदन घोगळे, जी.के. देशमुख, रंजना पाटील,स्नेहलता राणे, राजेंद्र देसाई, संतोष जाधव, नागनाथ येवले, प्रशांत राऊत, सिद्धाम माशाळे, पेटकर आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ व्हरकट यांनी केले तर आभार शाहू चौगुले यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स