स्वराज्य संघटनेची राज्य कार्यकारिणी जाहीर
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांची राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड
श्रीमंत युवराज संभाजी छत्रपती यांनी निवड केली जाहिर
सहसंपादक/नवलराज काळे- छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत युवराज संभाजी छत्रपती महाराज यांनी नव्याने स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण आणि आरोग्य हे प्रमुख विषय अजिंठा वरती घेऊन स्वराज्य संघटनेची स्थापना श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी केली. दिनदुबळ्या गोरगरीब जनतेला न्याय देण्याकरिता स्थापन केलेल्या संघटनेची संभाजी राजे यांनी कार्यकारणी जाहीर केली या कार्यकारणी मध्ये ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांची महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली. गेल्या अनेक वर्ष धनगर समाजाचे नेतृत्व करत कड्या कपारी राहणाऱ्या धनगर समाजाला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रवीण काकडे काम करीत आहेत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महासंघाच्या कार्यकारणी स्थापन करत त्यांनी धनगर समाजाला न्याय देण्याचे काम व धनगर समाज संघटित करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले आहे प्रवीण काकडे यांच्या या कामाचा आढावा घेत छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांची राज्य सदस्य पदी निवड केली आहे. प्रवीण काकडे यांच्या या निवडी बाबत सर्वत्र त्यांच्या अभिनंदन होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)