ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बांदिवडेतील श्री.पावणाई भगवती देवीच्या गोंधळ उत्सवातील दान संविता आश्रमाला मदत म्हणून सुपूर्त.

बांदिवडेतील श्री.पावणाई भगवती देवीच्या गोंधळ उत्सवातील दान संविता आश्रमाला मदत म्हणून सुपूर्त.

प्रकाशन: 19 Jan 2023 03:20 PM
वाचन संख्या 238

बांदिवडे गांवचे मानकरी व ग्रामस्थांचा सलग सातव्या वर्षी अनोखा उपक्रम.

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडे गांवातील जागृत देवस्थान श्री पावणाई भगवतीचा जुन्या मांडणीचा पहिला वार्षिकी गोंधळ ४ जानेवारीला तर दुसरा नविन मांडणीचा गोंधळ १३जानेवारीला संपन्न झाला.
ह्या दोन्ही गोंधळाला भाविक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोन्ही सोहळ्यांमध्ये भाविकांनी मोठ्या भक्तीभा‌वाने देवीला दान केले .दोन्ही गोंधळ संपन्न झाल्यानंतर देवीच्या पुढ्यातील दान बांदिवडे गावातील देवीचे मानकरी व गावकरी सलग सात वर्षे पणदूर(कुडाळ) येथील संविता आश्रमाला नारळ व तांदूळ देत आहेत व यंदाही ते दान संविता आश्रमाला दिले गेले.
३५० केली तांदूळ व ९०० नारळ असे आलेले दान संविता आश्रमाला दिले गेले.

बांदिवडे गांवच्या मानकरी व गावातील ग्रामस्थांची समाजाशी असलेली अनोखी बांधिलकी व बांदीवडे गावच्या ह्या सामाजिक उपक्रमाची जिल्ह्यातील सर्वच स्तरांतून प्रशंसा होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स