ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मडुरा माऊली जत्रोत्सव उत्साहात संपन्न.

मडुरा माऊली जत्रोत्सव उत्साहात संपन्न.

प्रकाशन: 11 Dec 2022 08:42 PM
वाचन संख्या 47

श्रावण | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मडुरा गांवची ग्रामदेवता श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव, नुकताच माहेरवाशीणी व भाविकांच्या उपस्थितीत, उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

सकाळी देवीची पूजा अर्चा झाल्यानंतर ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम झाले. रात्री श्री माऊली देवीची सवाद्य पालखी मिरवणूक सोहळा व मध्यरात्री आजगांवकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग संपन्न झाला. सिंधुदुर्गासह गोव्यातील भाविकांनी श्री देवी माऊली दर्शनाचा लाभ घेतला.

लाखो रुपयांची उलाढाल होणार्‍या या जत्रौत्सवात सिंधुदुर्गासह गोव्यातील व्यापारी आपल्या व्यवसायानिमित्त हाॅटेल, मिठाई, कपडे, स्टेशनरी व खेळनी दुकाने घेऊन आले होते. मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स