ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
बहुजन समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी पी.के. चौकेकर तर महासचिवपदी आनंद धामापूरकर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बहुजन समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी पी.के. चौकेकर तर महासचिवपदी आनंद धामापूरकर.

प्रकाशन: 18 Sep 2022 08:57 PM
वाचन संख्या 125

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पी.के. चौकेकर यांची ध्यक्षपदी तर महासचिव पदी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, बौद्ध धम्माचे श्रामणेर प्रशिक्षण घेतलेले असे आनंद धामापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली .


बसपाचे जेष्ठ कार्यकर्ते रवींद्र कसालकर व सुधाकर माणगावकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
उपाध्यक्षपदी बाळासाहेब खेमनगिरे , सचिव सुहास हिंदळेकर तर कोषाध्यक्ष म्हणून नरेंद्र पेंडुरकर यांची नियुक्ती करण्यात आली .
पी. के. चौकेकर हे १९९३ पासून बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत.
चौकेकर यांनी याआधी बसपाचे अध्यक्ष, प्रदेश सचिव, नाशिक झोन प्रभारी, प्रभारी या पदांची जबाबदारी सांभाळली आहे .आता पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर सिंधुदुर्ग अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.
पक्षाने विश्वासाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून जिल्ह्यात पक्षाची मजबूत बांधणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे श्री. चौकेकर यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स