करुळ घाटात पुन्हा नैसर्गीक आपत्ती..!
घाटात आता पोलिसांचा पहारा..!
वैभववाडी | नवलराज काळे : प्रतिवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करुळ घाट हा पावसाळ्यात कळीचा मुद्दा बनतो. आता करूळ घाटातील रस्ता आणि बाजूची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे तेथील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. ही घटना काल रात्री सव्वा दहा वाजता घडली असून याबाबत कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी सखोल माहिती दिली. आता प्रवाशांनी फोंडाघाट किंवा आंबोली पर्यायी मार्गाने प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे केले गेले आहे. याबाबतची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने पहारा ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी त्या मार्गावर वाहतूक रोखली आहे. तसेच आंबोली व फोंडाघाट या पर्यायी मार्गाने जाण्याच्या सूचना केल्या जात आहे. रस्ता लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून त्या ठिकाणी संबंधित यंत्रणेने धाव घेतली असल्याचे श्री. हुलावळे यांनी सांगितले.
पोलीस बंदोबस्त असल्याने वाहतुकीला आता कोणताही धोका नसला तरी या प्रश्नावर पावसाळ्यापूर्वी ठोस असे काहीतरी करण्यात यावे ही मागणी आता पुन्हा जोर धरु लागली असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)