ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे विशेष दांपत्य गौरव पुरस्कार जाहिर..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे विशेष दांपत्य गौरव पुरस्कार जाहिर..!

प्रकाशन: 26 Jul 2022 10:05 AM
वाचन संख्या 26

सिंधुदुर्ग मधील दोघांचा समावेश.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
गेली ९ वर्ष रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील विविध अप्रकाशित व्यक्ती व विशेष कार्य करणाऱ्या संस्था यांना पुरस्कार देणाऱ्या रत्नागिरीतील बोडस ट्रस्टने आपल्या दहाव्या वर्षानिमित्त विशेष दापत्य गौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. वैयक्तिक सन्मानपत्रे आणि रुपये ४,००० असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यात रत्नागिरी जिल्हयातील ३ आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील २ दांपत्यांचा समावेश आहे. पैकी एक दांपत्य दिव्यांग (उभयता मुकबधीर आहे.
सिंधुदुर्गातील वेतोरे देऊळवाडी (तालुका वेंगुली) येथील दिव्यांग (उभयता मुकबधीर) असे रुपाजी वसंत धुरी आणि सौ. रुपाली रुपाजी धुरी या दाम्पत्याने शेती करताना, खूप धडपड करून आपल्या पुजा या (२३ वर्षीय) मुकबधीर कन्येला पदवीपर्यंतचे शिक्षण दिले. जी. डी. आर्ट परीक्षेत पुजा धुरी ही राज्यात दिव्यांग गटात पहिली आली आहे. दांपत्य गौरव पुरस्काराने सन्मानित असे हे दिव्यांग दांपत्य आहे. सावंतवाडी तालुक्यातील कुंभार्लीवाडी मळगाव येथील गोसावी घराण्यात श्रावणात दीड दिवसाचा नागपंचमी उत्सव साजरा करण्याची २०० वर्षापेक्षा जुनी प्रथा आहे. एकत्र कुटुंबात हा उत्सव सर्व गावकयांसोबत साजरा होतो. शेतकऱ्याचा मित्र सर्प याचे बद्दल प्रेम, निसर्ग संगोपन आणि सामाजिक सलोखा या कार्याबद्दल गोसावी कुटुंबाचे प्रतिनिधी व गेली २२ वर्षे ही जबाबदारी सांभाळणारे धर्मनाथ शांताराम गोसावी व सौ रेश्मा धर्मनाथ गोसावी हे सम्मानित असे दांम्पत्य आहे.
तालुका लांजा येथे गेली ५० वर्षे दुर्गम आणि ग्रामीण भागात अपुऱ्या सुविधा असतानाही हजारो रुग्णांवर अल्प मोबदल्यात मोफत सुद्धा वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर शंकर विठ्ठल कलवारी आणि डॉक्टर सौ. सदबुधी शंकर कलवारी हे सन्मानित असे सर्वात वृद्ध दाम्पत्य आहे. रीळ केसपुरी या ग्रामीण भागात राहून गेली १८ वर्षे भात पिकावर संशोधन, बीजोत्पादन, देशी गाईचे संवर्धन करणारे मिलिंद दिनकर वैद्य आणि सौ. सुवर्णा मिलिंद वैद्य है सन्मानित असे सर्वात तरुण दांपत्य आहे. रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या भैरीबुवाच्या ट्रस्टचे तिसऱ्या क्रमांकाचे खोत म्हणून गेली २८ वर्षे आषाढ़ दशमी उत्सव, श्रावणसंततधार शिमगोत्सव तसेच कालभैरव मूर्ती वज्रलेप व देवी जोगेश्वरी मंदिर नूतनीकरण शिलान्यास आदी विविध धार्मिक कामे पार पडणारे बोधामृत निळकंठ फाटक आणि सौ. शुभदा बोधामृत फाटक हे रत्नागिरीमधील सन्मानित असे दांपत्य आहे.
या सर्व दाम्पत्यांना वैयक्तिक सन्मानपत्रे आणि रुपये ४,००० असा पुरस्कार दिला जाणार आहे. पैकी ४ दाम्पत्यांना पुरस्काराची रक्कम बँक माध्यमातून दिली जाणार आहे व सन्मानपत्रे रजिस्टर पोस्टाने पाठवली जाणार आहेत. ग्रामदेवता भैरीचे मानकरी अशा फाटक दाम्पत्याचा गौरव, देव भैरीजुगाई ट्रस्टचे अध्याक्ष मुन्नाशेठ सुर्वे व उपाध्यक्ष राजन जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे असे बोडस ट्रस्टच्या खजिनदार सी. आदिती पटवर्धन यांनी कळवले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स