आर.के.इलेक्ट्रॉनिक कडून दांडी शाळेला स्पिकर ट्राॅंली प्रदान..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
जि.प.पूर्ण प्राथ.दांडी शाळेसाठी अशोक राजाराम आचरेकर (दांडी) यांच्या स्मरणार्थ आर.के.इलेक्ट्रॉनिक्स मालवण चे भाई कोयंडे यांजकडून काँडलेस माईक सह ट्राँली स्पीकर सेट भेट देण्यात आला.सुमारे पाच हजार रुपये किमतीचा हा सेट आर.के.इलेक्ट्रॉनिक तर्फे दांडी शाळा पदवीधर शिक्षक श्री.शिवराज सावंत यांच्या जवळ सुपुर्द केला.दांडी शाळा मुख्याध्यापिक सौ.विशाखा चव्हाण ,सहाय्यक शिक्षिका सौ.मनीषा ठाकुर ,तंत्रस्नेही शिक्षक श्री.रामदास तांबे व मालवण केंद्रप्रमुख श्री.अन्वर शेख यांनी या भेटी बद्दल आर.के.इलेक्ट्रॉनिक चे विशेष आभार मानले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)