ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वैभववाडी कुसूर भुईबावडा एस.टी.बस सुरु करण्याची मागणी…!

वैभववाडी कुसूर भुईबावडा एस.टी.बस सुरु करण्याची मागणी…!

प्रकाशन: 08 Jul 2022 09:42 AM
वाचन संख्या 52

वैभववाडी | नवलराज काळे : वैभववाडी कुसूर भुईबावडा ही मानव विकास योजनातंर्गत एस.टी.बस सुरु करावी. अशी मागणी भाजपा युवा मोर्चा चिटणीस महेश तुळशीदास रावराणे यांनी केली आहे. अन्यथा दिनांक १० जुलै रोजी रास्तो रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. वैभववाडी एस.टी. वाहतूक नियंत्रकाकडे रावराणे यांनी लेखी निवेदन दिले आहे. वैभववाडी तालुक्यात मानव विकासतंर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी एस.टी.बस देण्यात आल्या आहेत. याअंतर्गत भुईबावडा ते कुसूर मार्गे सकाळी ७ वाजता एस.टी.बस फेरी सुरु करावी. ही बस फेरी बंद असल्यामुळे तिरवडे, कुसूर, नापणे, सोनाळी या गावातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याची दखल घेऊन तात्काळ एस.टी.बस सेवा सुरु करावी. अन्यथा दिनांक १० जुलै रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा रावराणे यांनी एस.टी.विभागाला दिला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स