ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वैभववाडी नायब तहसीलदारांची तालुक्यातून उचलबांगडी करा…
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वैभववाडी नायब तहसीलदारांची तालुक्यातून उचलबांगडी करा…

प्रकाशन: 06 Jul 2022 08:15 PM
वाचन संख्या 44

भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी ; नागरिकांशी उध्दट वागत असल्याचा आरोप…

वैभववाडी | नवलराज काळे : शैक्षणिक व शासकीय दाखले देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नायब तहसीलदार श्रीमती सविता कासकर यांची उचलबांगडी करा, अशी मागणी आढावा बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली. दाखल्यासाठी यापुढे नागरिकांना दुसरी फेरी मारायला लावू नका. त्यांना तात्काळ दाखले द्या. खोळंबलेले सर्व दाखले दोन दिवसात सोडा. अशा सक्त सूचना नितेश राणे यांनी तहसीलदार रामदास झळके यांना दिल्या आहेत.

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात आढावा बैठक पार पडली. तहसील कार्यालयात रामभरोसे कारभार चालू आहे. अधिवास दाखले, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले व शैक्षणिक दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना अनेक फेऱ्या माराव्या लागतात. नायब तहसीलदार श्रीमती कासकर या नागरिकांशी उद्धटपणे वागत आहेत. दाखले सोडण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यांची बदली करा. अशी मागणी सर्वांनी या बैठकीत केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स