बिळवस - हुमरोस साकव खचल्याने वाहतुकीस धोका..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मालवण तालुक्यातील बिळवस – हुमरोस मार्गावरील असलेला साकव खचल्याने धोका निर्माण झाला आहे. हुमरोस वाडीतील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी याच साकवाचा वापर वाहतुकीसाठी करतात. सदर मार्ग जवळचा असल्याने विद्यार्थी प्रवास करताना साकव खचल्यास दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता आहे.
तातडीने उपाय योजना न झाल्यास शाळेतील मुलांची गैरसोय होणार आहे.दरम्यान सरपंच सौ मानसी पालव, माळगाव सरपंच निलेश खोत, युगल प्रभुगावकर यांनी तातडीने भेट देत पाहणी करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहेत. प्रशासनाने तातडीने उपाय योजना करण्याची मागणी युवा कार्यकर्ते राहुल सावंत यांनी सुद्धा केली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)