ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आंदुर्ले ग्रामपंचायत सुवर्णमहोत्सवानिमित्त स्मरणिका प्रकाशन सोहळा व मान्यवरांचा सत्कार संपन्न…!

आंदुर्ले ग्रामपंचायत सुवर्णमहोत्सवानिमित्त स्मरणिका प्रकाशन सोहळा व मान्यवरांचा सत्कार संपन्न…!

प्रकाशन: 04 Jul 2022 07:43 PM
वाचन संख्या 38

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
आंदुर्ले ग्रामपंचायत सुवर्णमहोत्सवानिमित्त स्मरणिका प्रकाशन सोहळा आंदुर्ले ग्रामपंचायतच्या सभागृहात तहसिलदार श्री. अमोल पाठक यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर आंदुर्ले सरपंच सौ. पूजा सर्वेकर, उपसरपंच श्री. ज्ञानेश्वर तांडेल, सुवर्णमहोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण पाटील (आबा पाटील), संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष श्री. अतुल बंगे, कुडाळ पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. नारायण परब, कृषी अधिकारी श्री. प्रफुल्ल वालावलकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री. संजय ओरोसकर, श्री. आर.डी. जंगले उपस्थित होते. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी, शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
4 जुलै http://localhost/news/public/uploads/2022 रोजी ग्रामपंचायतला 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने तहसिलदार यांच्या हस्ते उपकेंद्र आंदुर्ले येथील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, मदतनीस यांच्या आरोग्यविषयक कार्याबद्दल शाल, श्रीफळ व सन्मापत्र देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. संतोष पाटील यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स