ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
<em>राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेत भाजपचा चमत्कार..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेत भाजपचा चमत्कार..!</em>

प्रकाशन: 20 Jun 2022 11:50 PM
वाचन संख्या 85

वैभववाडी |नवलराज काळे :
राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारला विधान परिषद निवडणुकीतही मोठा धक्का बसला आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत.
राज्यसभेनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद निवडणुकीतही चमत्कार घडवला आहे. भाजपचे पाचही उमेदवार फडणवीस यांनी निवडून आणले आहेत.
विधान परिषदेच्या नवव्या आणि दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप तसंच चंद्रकांत हंडोरे यांच्यात जोरदार चुरस होती. पण अखेर प्रसाद लाड यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची रणनिती पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे.
भाजपने पाच उमेदवार दिले होते, त्यापैकी चार उमेदवार विजयी होणार हे निश्चित होतं. त्यानुसार राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे विजयी ठरले. तर पाचव्या जागेसाठी प्रसाद लाड यांची भाई जगताप यांच्याशी चुरस होती. पण प्रसाद लाड यांनीही बाजी मारल्याने देवेंद्र फडणवीस यांची जादू पुन्हा चालली.
भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाल्यानंतर भाजपच्या आमदारांनी एकच जल्लोष केला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स