श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव २९ मे रोजी..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मसुरे देऊळवाडा दत्तमंदिर येथील श्री समर्थ बागवे महाराज मठ येथे २९ मे रोजी श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने सकाळी ८ : ०० ते १० : ०० वाजता पूजा अर्चा, ११ वाजता समर्थांच्या समाधीचे पुजन व अभिषेक, दुपारी १२:०० महाआरती, दु. १:०० ते ३: ०० वाजता महाप्रसाद, सायं. ७:०० वाजता स्थनिकांची सुश्राव्य भजने, रात्रौ ठीक ९:३० वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग असे कार्यक्रम होणार आहेत. याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)